…म्हणून Google करणार आपली ‘ही’ खास सेवा कायमची बंद !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – गुगलने आपल्या खास सेवेबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. गुगलने आठ वर्षांपासून सुरु असलेली गुगल प्ले म्युझिक अँप हि सेवा येत्या २४ फेब्रूवारी रोजी बंद करणार असून यानंतर गुगल या अँपला कोणत्याही प्रकारचा आधार देणार नाही. त्यामुळे जर तुम्ही गुगल प्ले म्युझिक युजर असाल तर तुमच्या केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. जर तुम्ही तुमची आवडती गाणी आतापर्यंत गुगल प्ले म्युझिकवर सेव्ह करुन ठेवले आहेत, तर दुसऱ्या कोणत्यातरी अँपवर सेव्ह करून ठेवावी. गेल्या वर्षी कंपनीने गुगलने आपल्या गुगल प्ले म्युझिक अँपला युट्यूब म्युझिक अँपमध्ये रिप्लेस करणार असल्याची घोषणा केली होती .

गुगल आपल्या यूजर्सना इ मेलला गुगल प्ले म्युझिक अँपच डेटा पाठवणार आहे तो डाटा आपल्याला युट्यूब म्युझिक अँपवर ट्रान्सफर करावा लागेल. जर डाटा डिलिट केला तर तो पुन्हा रिकव्हर केले जाऊ शकत नाही.
दरम्यान गुगल हि सेवा बंद करण्याचे प्रमुख कारण म्हणजे म्युझिक सेगमेंटमध्ये वाढत चाललेली स्पर्धा असल्याचे सांगितले जात आहे. सध्या खूप सारे म्युझिक अँप्लिकेशन्स जसे की स्पोटिफाय, विंक असे अँप आहेत.

असा करा आपला डाटा ट्रान्सफर
मोबाईल अँप किंवा musicgoogle.com जाऊन करु शकता. मोबाईल अँपचा डाटा ट्रान्सफरसाठी डेस्कटॉपवर युट्यूब म्युझिक किंवा दुसऱ्या ठिकाणाचा पर्याय मिळेल. याशिवाय तुम्ही तुमची म्युझिक लायब्ररी डाऊनलोड ही करु शकता किंवा डिलिट ही करु शकता.