Realme च्या ग्राहकांसाठी ‘अलर्ट’ ! होऊ शकते मोठी फसवणूक, कंपनीनं दिला सावधानतेचा ‘इशारा’

नवी दिल्ली : वृत्त संस्था –  खुपच कमी कालावधीत भारतीय स्मार्टफोनमध्ये आपली पकड मजबूत करणारी मोबाईल कंपनी रियलमीने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. रियलमीने हा अलर्ट रियलमीच्या नावाने सुरू असलेल्या एका बनावट वेबसाईटबाबत जारी केला आहे. www.realmepartner.in या वेबसाईटचा वापर लोकांशी रियलमीसोबत पार्टनरशिप आणि फ्रेंचायजीसाठी होत आहे, परंतु सत्य हे आहे की ही एक बनावट वेबसाईट आहे. रियलमीने एक प्रेस रिलीज जारी करून म्हटले आहे की त्यांची अधिकृत वेबसाइट www.realme.com आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, या रियलमी डॉट कॉमशिवाय कोणत्याही वेबसाईटवरून करण्यात आलेली भागीदारीला कंपनी जबाबदार असणार नाही. रियलमीने www.realmepartner.in च्या विरूद्ध तक्रार सुद्धा दाखल केली आहे.

www.realmepartner.in वेबसाईटवर अनेक खोटे बॅनर लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये पार्टनरशिप करण्याचा दावा करण्यात आला आहे. या बनावट साइटवर फ्रेंचाइजीसाठी अर्जसुद्धा मागितले जात आहेत.

यापूर्वी शाओमीच्या नावाने एक बनावट वेबसाईट बनवून लोकांची फसवणूक केली जात होती. शाओमीच्या नावाने चालवली जाणार्‍या बनावट वेबसाईटची माहिती मागच्या फेब्रुवारीमध्ये शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनु कुमार जैन यांनी दिली होती.