4 कॅमेरे, 4 जीबी रॅम, पॉवरफूल बॅटरी बॅकअप असलेल्या ‘या’ स्मार्टफोनची किंमत फक्‍त 7999, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – हॉगकॉगची कंपनी टेक्नो मोबाइलने आपला नवा स्मार्टफोन ‘स्पार्क 4’ भारतात लॉन्च केला आहे. या फोनची किंमत फक्त 7,999 रुपये असणार आहे. ही किंमती 3 जीबी + 32 जीबी मॉडल असलेल्या वेरिएंटसाठी आहे. तर याच्या 4 जीबी + 64 जीबी वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे.
या फोनमध्ये 6.5 इंच एचडी प्लस डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रेजोल्युशन 720 x 1600 आहे. डिवाइसमध्ये 90 टक्के स्क्रिन टू बॉडी रेशियो आहे.

13 मेगापिक्सल कॅमेरा –
या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल AI प्राइमरी सेंसर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. एलईजी फ्लॅशबरोबरच 2 एमपीचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. यात थर्ड लो रेट कॅमरा सेंसर देखील आहे. डिवाइसमध्ये फ्लॅश बरोबरच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 4 एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे.

पॉवरफुल बॅटरी –
3 जीबी रॅम वेरिएंट वेकेशन ब्लू आणि रॉयल पर्पल कलर देण्यात आला आहे तर 4 जीबी रॅम वेरिएंमध्ये बे ब्लू आणि मॅजेस्टिक पर्पल कलर देण्यात आला आहेे. या फोनमध्ये 9.0 अॅण्ड्राइड देण्यात आला आहे. बॅटरी पॉवर 4000 mA आहे.

सेशन इंडियाचे सीईओ अरिजीत तलपत्रा यांनी सांगितले की आपल्या स्पार्क सीरिज बरोबर आम्ही भारतात 5 ते 10 हजार पर्यंतच्या किंमतीचे फोन बाजारात आणणार आहे. आम्हाला खात्री आहे की ग्राहकांना नव्या रेंजमध्ये मिळणार या फोनचा ग्राहकांकडून चांगला रिस्पॉस्न मिळेल.

Visit : Policenama.com