1 सप्टेंबरला भारतात लाँच होणार ‘टेक्नो स्पार्क गो 2020’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेक्नो कंपनीचा नवीन स्मार्ट फोन टेक्नो स्पार्क गो 2020 भारतात 1 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. कंपनी आपला नवीन हँडसेट भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या स्मार्टफोनची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. टेक्नोला नवीन फोनसाठी ई-कॉमर्स वेबसाईटवर मायक्रो साईट बनवली आहे. या माहितीनुसार, टेक्नोच्या नवीन फोनचे नाव Tecno Spark Go 2020 असणार आहे. फ्लिपकार्टवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, हँडसेट 1 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच करण्यात येणार आहे.

कंपनीकडून फोनच्या डिझाईनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी नॉच आणि स्लिम बेजल दिसत आहे. फोनच्या खाली मायक्रो यूएसबी आणि डेटा सिंक, 3.5 एमएम ऑडियो जॅकी तसेच मायक्रोफोन आहे. कंपनीने या फोटोसोबत ‘Big B of entertaninment’ टॅगलाईनचा वापर केला आहे. यावरुन संकेत मिळत आहेत की, फोनच्या वरच्या भागात वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन देण्यात आले आहेत.

आगामी टेक्नो फोन जानेवारीत लाँच करण्यात आलेल्या टेक्नो स्पार्क गो चे अपग्रेड व्हर्जन असणार आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. हँडसेट 6.52 इंचाचा डिस्प्ले असणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. बॅटरी दिवसभर चालण्याची अपेक्षा आहे. हँडसेट संबंधी अद्याप जास्त माहिती नाही. कंपनीने तारीख जाहीर केली नाही. मात्र, फोनच्या टीजरवरून माहिती होतेय की, हा फोन 1 सप्टेंबर रोजी लाँच केला जाऊ शकतो.