संतापजनक ! 12 मुलांनी ‘गँगरेप’ केल्याचं प्रकरण : मुलीच्या शरीरावर 35 ठिकाणी ‘जखमा’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – एका मुलीवर 12 मुलांनी केलेल्या बलात्काराच्या घटनेमध्ये नवीन माहिती समोर आली आहे. फॉरेंसिक पैथोलॉजिस्ट ने दिलेल्या अहवालानुसार मुलीला शरीरावर 35 ठिकाणी जखमा झाल्या होत्या. हा सर्व प्रकार साइप्रस येथील आहे जिथे ब्रिटिश मुलीसोबत दुर्घटना घडली होती.

साइप्रस येथील न्यायालयाने गेल्या आठवड्यात मुलीच्या मागणीला खोटे ठरवले याबाबत मुलीला शिक्षा देखील होऊ शकते. त्यातच न्यायालयाच्या निर्णयावर अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. मुलीच्या पायावर,डोळ्यांवर आणि पाठीसह अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या आहेत त्याला न्यायालयाने पुरावा म्हणून का पहिले नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या खटल्याची सुनावणी करताना न्यायाधीशांनी सांगितले की मुलगी समुद्रात आंघोळीसाठी गेली होती, त्यादरम्यान तिच्या शरीरावर जखमा झाल्या. कोर्टाने जखमांना जेलीफिश च्या खुणा असल्याचे सांगितले.

त्याचवेळी,फॉरेन्सिक पॅथॉलॉजिस्ट डॉ. मारिओस मैटसकिस यांनी न्यायालयाचा निर्णय अजिब असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ज्यांना लोकांना वैद्यकीय अनुभव आहे ते सर्वजण सांगू शकतात की मुलीच्या शरीरावर असलेल्या जखमा निशान जेली फिशने झालेल्या नाहीत.

जुलैमध्ये सुट्टीसाठी 19 वर्षाची मुलगी सायप्रसला गेली होती तेव्हा तिने एका हॉटेलमध्ये 12 मुलांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. सुरुवातीला पोलिसांनी आरोपींना अटक केली, पण त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. यानंतर पोलिसांनी मुलीवर खोटे बोलण्याचा आरोप लावला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/