धक्कादायक ! चुंबनास नकार दिल्याने विद्यार्थिनीचा खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील जबलपुरातील बिजापुरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावात चुंबन घेण्यास नकार दिला म्हणून विद्यार्थिनीचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. 5 सप्टेंबर रोजी हि घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बळजबरीने चुंबन घेण्यास विरोध केला म्हणून या 18 वर्षीय विद्यार्थिनीचा खून करण्यात आला. पोलिसांना या विद्यार्थिनीचा मृतदेह जंगलात आढळून आला. त्यावेळी तिच्या डोक्याच्या मागील भागास मोठी जखम झाली होती. हि विद्यार्थिनी 12 वी इयत्तेत शिकत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजवरून घरी परतत असताना दोघेही एका कालव्याच्या कडेला बसले होते. यावेळी त्या विद्यार्थ्याने तिच्याकडे चुंबनाची मागणी केली. मात्र तिने त्यासाठी नकार दिला. त्यामुळे राग आलेल्या त्याने तिला खाली धक्का दिला आणि ती एका दगडावर आदळली. यामुळे डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर पुढील तपास देखील सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –