‘या’ युवतीनं कंडोममध्ये लपवलं होतं ‘ड्रग्ज’, पार्टीमध्ये पोहचल्यावर झाले असे ‘हाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ड्रग्सची नशा ही खुप भयंकर असते. परंतु काही लोक हे लपवून हुशारी दाखवतात आणि अनेकदा अडचणीत सापडतात. असाच काहीसा प्रकार एका 19 वर्षांच्या हेयर ड्रेसरने सिडनीच्या एका फेस्टिव्हलमध्ये केला. जेव्हा ती सापडली तेव्हा तिने कबुल केले की तिने ड्रग्स ठेवले होते. परंतु ड्रग्ज ठेवण्याची तिची पद्धत खुप विचित्र होती. या मुलीने कंडोमच्या आत कोकेन आणि केटामाईनच्या टॅबलेट्स टाकून ते आपल्या अंडरवेयरमध्ये ठेवले होते.

ताया क्रोथर असे या हेयरड्रेसरचे नाव आहे. 19 वर्षीय ताया क्रोथरने ही गोष्ट पोलीस आणि न्यायालयासमोर कबुल केली की तिने अंडरवेयरच्या आत कंडोममध्ये कोकेन आणि केटामाइन लपवले होते. ही घटना आहे फील्ड डे फेस्टिव्हलमधील जो सिडनीमध्ये सुरू होता. ताया क्रोथर आपल्या बॉयफ्रेंडसोबत या फेस्टिव्हलमध्ये गेली होती. तेथे तिने अंडरवेयरच्या आत एका कंडोममध्ये बंद असलेले ड्रग्स लपवले होते. ताया क्रोथरला फेस्टिव्हलमध्ये पोलिसांनी तपासणीसाठी अडवले. तिला एका तंबूत नेण्यात आले. जेथे महिला पोलिसाने तिचे कपडे काढून झडती घेतली असता तिच्या अंडरवेयरमधून कंडोम निघाला. या कंडोममध्ये ड्रग्ज ठेवले होते.

यानंतर पोलिसांनी तिला गोसफोर्ड लोकल कोर्टात हजर केले. कोर्टात सांगण्यात आले की ताया क्रोथर सिडनीमधील एका प्रसिद्ध सलूनमध्ये चीफ हेयरड्रेसर आहे. कोर्टात ताया क्रोथरने सांगितले की, तिने चुकून चुकीचा कंडोम उचलला असेल. कारण तिच्या बॉयफ्रेंडने कंडोममध्ये दोन पॅकेट कोकेन आणि एक छोटा पॅक केटामाइनचे ठेवले होते.

पोलिसांनी गोसफोर्ड लोकल कोर्टातील न्यायाधीशांना सांगितले की, ताया क्रोथरने सर्व तपासात मदत केली. सॉलिसिटर जनरलने सुद्धा ताया क्रोथरने आपली चूक कबुल केल्याचे सांगितले. यानंतर गोसफोर्ड लोकल कोर्टाच्या मॅजिस्ट्रेट एलेन रेलटन यांनी म्हटले की ताया क्रोथरचे प्रकरण खुप चर्चेत आहे. मीडियात याची खुप चर्चा होत आहे. तायाने तिची चूक कबुल केली आहे. कोर्टाने यानंतर ताया क्रोथरला सामाजिक सेवेची शिक्षा सुनावली. सोबतच सांगितले की, 12 महिन्यापर्यंत तिने चांगली वागणूक ठेवावी.