रेसिंग बाईक्स चोरणारी अल्पवयीन मुलांची टोळी ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- महागड्या रेसिंग बाईक्स चोरणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीला मानापाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अल्पवयीन मुलांनी रेसिंगसाठी या दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. पकडण्यात आलेल्या चार जणांपैकी तीनजण अल्पवयीन आहेत. त्यांना रेसिंग बाईक चोरण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

डोंबिवली आणि आसपासच्या परिसरामध्ये काही दिवसांपासून बाईक चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या चोरांना पकडण्यासाठी पोलिस पाळत ठेवून होते. मानपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी सोनारपाडा येथे नाईटची गस्त घातल होते. त्यावेली दोन दुचाकीवरुन चार जण संशास्पदरित्या फिरताना पोलिसांना दिसले.

या चौघांना हटकलं असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी कसून या मुलांची चौकशी केली असता बाईक चोरण्याच्या उद्देशानं फिरत असल्याची कबूली त्यांनी दिली. त्यांच्याकडून सात चोरलेल्या दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या चौघांपैकी तीन जण हे अल्पवयीन असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व गाड्या ते बाईक रेसिंगसाठी वापरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Loading...
You might also like