किशोरवयातील लठ्ठपणामुळे वाढतो ‘हार्ट फेल’ चा धोका !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – लठ्ठपणा ही समस्या सध्या संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरत आहे. भारतामध्येही लठ्ठपणा ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे. बदललेली जीवनशैली हे याचे प्रमुख कारण आहे. शिवाय ही समस्या केवळ प्रौढांमध्ये नसून सर्व वयोगटाच्या व्यक्तींमध्ये दिसून येते. अगदी लहान मुलांनाही हा त्रास भेडसावत आहे. लठ्ठपणा हा एक आजार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कारण लठ्ठपणा आला की अन्य आजार त्याच्या पाठोपाठ आपोआपच येतात. यासाठी वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे जरूरी आहे. एका संशोधनातून एक धक्कादायक बाब समोर आली असून ती म्हणजे ज्या लोकांचे वजन किशोरवयात अधिक असते, त्यांना रेअर टाइपची ‘हार्ट मसल डॅमेज’ होण्याची समस्या होऊ शकते. ही मसल डॅमेज झाल्यास त्या व्यक्तीचे हार्ट फेल होण्याची शक्यता असते.

स्वीडनमध्ये करण्यात आलेल्या या संशोधनात १.६ मिलियन लोकांचा उंची, वजन आणि फिटनेस संदर्भातील महितीचा अभ्यास करण्यात आला. हे लोक स्वीडनमध्ये १९६९ आणि २००५ दरम्यान १८ ते १९ वयाचे असताना मिलिटरी सर्व्हिसमध्ये सहभागी होते. सुरूवातीला केवळ १० टक्के लोक ओव्हरवेट आणि लठ्ठपणाचे शिकार होते. २७ वर्षांच्या फॉलोअपनंतर ४ हजार ४७७ लोकांमध्ये कार्डिओमायोपॅथीची समस्या आढळली. ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. या संशोधनातून असेही निदर्शनास आले की, ज्यांचे वजन किशोरवयात अधिक असते, त्यांच्यात कार्डिओमायोपॅथी होण्याचा धोका ३८ टक्के जास्त असतो.
कार्डिओमायोपॅथीचे विविध प्रकार असून त्याची कारणे अद्याप व्यवस्थित समजलेली नाहीत. यामुळे हार्टची काम करण्याची क्षमता घटून हार्ट ब्लड पम्प करत नाही आणि हार्ट फेल होतो. अशाप्रकारे होत असलेल्या हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेतली पाहिजे. एका संशोधनानुसार झोप हृदयाला निरोगी ठेवते. जे रात्री एक तास अधिक झोप घेतात त्यांना हृदयाचे आजार इतरांच्या तुलनेत कमी असतात. तेच ७ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना हृदयाचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. दुसरे म्हणजे हा धोका टाळण्यासाठी कोलेस्ट्राॅल कमी केले पाहिजे. रक्तात अधिक प्रमाणात कोलेस्ट्राॅल असणे खूपच धोकादायक आहे. यामुळे हृदयासंबंधी आजार होतात. कोलेस्ट्राॅल नियंत्रित ठेवून सतत तपासणीही केली पाहिजे.

नियमित व्यायाम केल्यास वजन कमी होते. यामुळे मधुमेह होण्याचीही शक्यता कमी असते. मधुमेह असलेल्या लोकांना हार्टअटॅक येण्याची शक्यता अधिक असते. तसेच जेवणात कमी प्रमाणात वापरावे. ताज्या हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन करावे. यामुळे शरीराला अ‍ँटी-ऑक्सीडेंट्स मिळतात. कोलेस्ट्राॅलचा प्रभाव कमी होतो. रोज भाज्या खाल्यास हृदय निरोगी राहते. तसेच जंक फूड टाळावे, जेवण वेळेवर व सकस घ्यावे. सिगारेट ओढणे महिलांच्या हृदयासाठी खूपच धोकादायक आहे. मध्यम वर्गातील महिलांना तंबाखूमुळे हार्टअटॅक येऊन जीव गमवावा लागण्याचे प्रमाण हे ५० टक्के आहे. धुम्रपानामुळे हार्टअटॅक येण्याची शक्यता अधिक असते. वजन जास्त असल्यास हृदयावर अधिक दाब येतो. हृदयाचे ठोके अधिक वाढतात. तणाव हे हार्ट अटॅक येण्याचे मुख्य कारण आहे. यासाठी तणावमुक्त राहिले पाहिजे. मद्याचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास उच्च रक्तदाब व हृदयासंबंधीचे आजार होतात.