मंगळसूत्र अन् कुंकू घेवून आला 17 वर्षीय मुलगा, क्लासरूममध्येच केलं लग्न, व्हिडीओ झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन : एका अल्पवयीन मुला-मुलीचा वर्गातच लग्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वर्गातल्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मााहितीनुसार, 17 वर्षाचा मुलगा आपल्यासोबत मंगळसूत्र घेऊन येतो आणि त्याने वर्गातच मुलीला सिंदूर लावले. ही घटना आंध्र प्रदेेेेशातील आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजामहेन्द्रवरम येथे असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात या विद्यार्थ्याचे लग्न झाले. पोलिसांनी घटनेसंदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी बाल विवाह कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल केला असून ज्याने ‘लग्न केले’ त्या व्यक्तीचा शोध सुरू आहेे

हे विवाह कायदेशीररित्या वैध नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुला-मुलींचे समुपदेशनही अधिकाऱ्यांनी केले आहे. अहवालानुसार दोघेही इंटरमीडिएटचे शिक्षण घेत आहेत आणि वर्गमित्र आहेत. आंध्र प्रदेश महिला आयोगाने असे म्हटले आहे की ते मुलीला राहण्यासाठी जागा देतील. सोशल मीडियावर लग्नाची छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिस आणि अन्य अधिका्यांना या घटनेची माहिती मिळाली. असं म्हणतात की दुसर्‍या अल्पवयीन मुलीने ती छायाचित्रे क्लिक केली. त्याचबरोबर, लग्न करणार्‍या विद्यार्थी आणि मुलीला महाविद्यालयातून काढून टाकले आहे आणि बदली प्रमाणपत्र दिले आहे. आंध्र प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा वसीरेड्डी पद्म यांनी म्हटले आहे की, मुलीच्या पालकांनी तिला घरी परत येऊ दिले नाही. त्यानंतर मुलीला समुपदेशनासाठी वन स्टॉप सेंटरमध्ये नेण्यात आले.