‘काय सांगता’ ! ‘कबीर सिंह’ पाहण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून ‘चक्‍क’ आधार कार्डशी ‘छेडछाड’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – जयपूरमध्ये उघडपणे तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन किशोरवयीन मुलांनी ए-रेटेड बॉलीवूड चित्रपट ‘कबीर सिंह’ पाहण्यासाठी आधार कार्डवर आपले वय वाढवून टाकले. शाहिद कपूरचा चित्रपट ‘कबीर सिंह’ सिनेमा हॉल मध्ये सुपरहिट चालतो आहे. परंतु याला ‘वयस्कर’ प्रमाण पत्र भेटले आहे. त्यामुळे हा चित्रपट १८ वर्षा पेक्षा कमी लोक बघू शकत नाही. आकाश (बदललेले नाव) ने सांगितले की, “माझ्या मित्रानी आणि मी माझ्या आधार कार्डचा एक फोटो घेतला आणि जन्मतारीख बदलण्यासाठी मोबाईल अ‍ॅपवर एडिट केले. आम्हाला थिएटरच्या बाहेर कोणी आडवले नाही आणि मग आम्ही चित्रपट पाहण्यात यशस्वी झालो.

आणखी एक विद्यार्थी युवराजने (बदललेले नाव ) सांगितले की, “बुक माय शो’ वरून आम्ही मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणीही आमच्या वयाबद्दल किंवा ओळख पत्राबद्दल विचारले नाही.”त्याने पुढे सांगितले की, ”सिनेमा हॉलच्या गार्डने आम्हाला अडवले परंतु आमच्या स्कूल मधील मित्राने सांगितले होते की, या गोष्टीला कशे तोंड दयायचे. म्हणून आम्ही आमच्या स्मार्टफोनवरून आमच्या आधार कार्डची एक छायाचित्र घेतली, जन्मतारीख बदलली आणि काही मिनिटांत वयस्कर बनलो.” आईनॉक्सच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा ग्राहक ए-रेटेड फिल्मबद्दल विचारतो. तेव्हा आम्ही स्पष्टपणे सांगतो की, केवळ १८ वर्षापेक्षा जुने लोक ही पाहू शकतात. ए-रेटेड चित्रपटांच्या तिकिटावर आम्ही लाल स्टॅम्पही लावतो”.

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव