प्रत्येकाला ‘या’ मुलीकडून मिळतोय ‘धोका’, तरीदेखील सर्वजण होतात ‘भक्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या एका टीनेजरचा टिक टॉक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रत्येकाला तिच्याकडुन फसवले जात आहे, तरीही तिचे कौतुक केले जात आहे. वास्तविक, अमेरिकन मुलगी टिक टॉकवरील मेक-अप ट्यूटोरियलच्या बहाण्याने चीनच्या शिनजियांग प्रांतात मुस्लिमांच्या दडपशाहीबद्दल बोलली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टिक टॉकने हा व्हिडिओ काढला पण नंतर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

या मुलीच्या व्हिडिओला लाखो व्युव्हज आले असून या मुलीचे नाव फिरोजा अजीज आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अजीज प्रथम प्रेक्षकांना आईलैश कर्ल कसे करावे आणि नंतर त्यात बदल कसे करावे हे सांगताना दिसतेय. ती म्हणते की, प्रथम आपला आईलैश कर्लर पकडा आणि आता चीनमध्ये काय होत आहे हे पाहण्यासाठी आपल्या फोनवर सर्च करा. ती मुलगी चीनवर निर्दोष मुस्लिमांना ताब्यात घेतल्याचा आरोप करत आहे. अजीज म्हणते की मुस्लिमांचे अपहरण करुन त्यांना त्यांच्या कुटूंबापासून वेगळे केले जात आहे. बऱ्याच मुस्लिमांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली जात आहे आणि काहींना डुकराचे मांस खाण्यास, मद्यपान करण्यास व धर्म बदलण्यास भाग पाडले जात आहे.

अजीजचे सर्व व्हिडिओ सुरु तर मेक-अप ट्यूटोरियल ने होतात परंतु काही वेळानंतर ती चीनमधील मुस्लिमांवर बोलणे चालू करते. अजीज म्हणते की तिने हि पद्धत या करीता अवलंबली आहे कारण की, टिक टॉकवर तिच्या कंटेन्टवर कुणी बंदी घालू नये. काही व्हिडिओमध्ये अजीज लोकांना सांगते की आपण उइघुर मुस्लिमांना कशी मदत करू शकतो.

तिने सुदानचेही उदाहरण दिले, त्यानुसार माजी नेता उमर अल-बशीर यांच्या सत्तांतरानंतर झालेल्या हिंसाचारादरम्यान सोशल मीडियावरील दबाव स्पष्टपणे दिसत असल्याचे तिने सांगितले. अजीज म्हणते की, आमचा आवाज खूप काही करू शकतो. याने काही फरक पडत नाही की आम्ही १८ वर्षाचे आहोत किंवा नाही, आम्ही मतदान करण्यास पात्र आहोत की नाही, आम्ही आमचा आवाज उठवू शकतो. प्रत्येकजण अजीजच्या या पद्धतीची प्रशंसा करीत आहे. ट्विटरवर जनजागृती करण्याचा प्रयत्न करणारी मुस्लिम असल्याचे अजीज स्वत: चे वर्णन करते.

Visit : Policenama.com