Teeth Whitening | पिवळेपणा दूर करुन दात चमकदार आणि मजबूत करण्यासाठी ‘या’ आहेत 5 गोष्टी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Teeth Whitening | दररोज ब्रशने दात (Teeth) घासले तरी दाताचा पिवळेपणा तसाच राहतो. त्यामुळे किती जरी दात स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला तरी दातांच्या समस्या उद्भवतात. मात्र खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि अधिक दुर्लक्ष केल्याने दाताच्या समस्यांचा सामना करावा लागतो (Teeth Whitening Tips). तर दातांत अडकलेली घाण किंवा पिवळसरपणा रोज दात घासल्याने साफ होत असली तरीही काही वेळा ती घाण किंवा पिवळसरपणा घट्ट चिकटून राहतो. मजबूत आणि पांढरे दात होण्यासाठी काही उपाय (Teeth Whitening) आहेत. त्याबाबत जाणून घेणे महत्वाचे आहे. (5 natural home remedies to make yellow teeth shine like pearls again)

 

1. कडुलिंबाची पाने (Neem Leaves) –
सर्वात आधी एका भांड्यात कडुलिंबाची पाने उकळण्यासाठी टाका. नंतर हे पाणी गाळून घ्या करा जेणेकरून पाणी साफ होईल. हे पाणी थंड होऊ द्या आणि या पाण्याने गुळण्या करा. (Teeth Whitening)

 

2. कोको पावडर (Cocoa Powder) –
यासाठी तुम्हाला कोको पावडर आणि पाणी किंवा खोबरेल तेल लागेल. प्रथम कोको पावडर खोबरेल तेल किंवा पाण्यात मिसळा. त्याची पेस्ट बनवा. नेहमीप्रमाणे या मिश्रणाने दात घासून घ्या.

 

3. आले आणि लिंबू (Ginger And Lemon) –
आल्याचा छोटा तुकडा घ्या किंवा किसलेले आले देखील घेऊ शकता. 1/4 टीस्पून मीठ घेऊन आल्यात टाका. लिंबाचा तुकडा कापून मिश्रणात लिंबाचा रस पिळून घ्या आणि पुन्हा मिश्रण चांगले मिसळा. ते टूथ ब्रशने दातांवर लावा.

4. सैंधव मीठ (Pink Salt) –
सैंधव मीठ आणि पाणी समान भागांमध्ये मिसळा. मीठ पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत हे ढवळा. हे मिश्रण टूथ ब्रशने दातांवर लावा. तुम्ही या पाण्याने गुळण्या देखील करू शकता आणि नंतर स्वच्छ पाण्याने तोंड धुवू शकता.

 

5. पुदिन्याची पाने व नारळ तेल (Mint Leaves And Coconut Oil) –
पुदिन्याची पाने बारीक करून खोबरेल तेलात मिसळा. चांगले मिसळून हे मिश्रण टूथ ब्रशने दातांवर लावा. पुदिन्याचा अतिवापर करू नका, 3 ते 5 पाने पुरेशी आहेत.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Teeth Whitening | here are 5 natural home remedies to make yellow teeth shine like pearls again

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Radish Health Benefits | जाणून घ्या पोटाचा त्रास टाळण्यासाठी मुळा खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

 

Yoga Asanas For Neck Pain Relief | मानदुखी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात ‘ही’ आसने; जाणून घ्या

 

Skin Care Tips | उन्हाळ्यात तेलकट त्वचा होतेय?; मग ‘हे’ उपाय करा, होईल समस्या दूर