‘बिग बी’ अमिताभकडून 50 लाखाचं बक्षिस जिंकणारी महिला तहसिलदार तडकाफडकी ‘निलंबीत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील राजस्व विभागातील एका महिला अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. या महिला अधिकाऱ्यानं बिग बी अमिताभ बच्चन यांचा क्वीज शो कौन बनेगा करोडपती मध्ये 50 लाखांचं बक्षिस जिंकलं होतं. अमिता सिंह तोमर असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं शुक्रवारी सांगितलं की, तहसिलदार अमिता सिंह तोमर यांनी 23 डिसेंबर रोजी एका व्यक्तीच्या टिप्पणीला प्रत्युत्तर दिलं होतं. त्या व्यक्तीनं कराहल भागातील अतिक्रमण हटवण्याला घेऊन टिप्पणी केली होती. यावर त्या अधिकाऱ्यानं प्रत्युत्तर देत टिप्पणी केली होती.

त्यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी पोस्टमध्ये धर्माला घेऊन टिप्प्णी केली होती ज्यात त्यांनी वाईट शब्दांचा प्रयोग केला होता. त्यांनी सांगितलं की, चंबळचे विभागीय आयुक्त रेणु तिवारी यांनी मंगळवारी कारणे दाखवा नोटीशीला उत्तर दिल्यानंतर शुक्रवारी त्यांना निलंबित करण्यात आलं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/