Tehsildar Laila Dawal Shaikh | शिरुरच्या महिला तहसीलदार लैला शेख यांची बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune district) शिरुर (Shirur) येथील तहसीलदार लैला शेख (Tehsildar Laila Dawal Shaikh) यांची सोलापूर येथे सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी या रिक्त पदावर बदली करण्यात आली आहे. लैला शेख यांच्या विरोधात विभागीय आयुक्तांना (Pune Divisional Commissioner) अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच शेख (Tehsildar Laila Dawal Shaikh) यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील झाली होती. शेख यांच्या बदलीचा अहवाल विभागीय आयुक्तांनी शासनाला पाठवला होता. या अहवालाला आज (शुक्रवार) महसूल व वन विभागाने मंजूरी दिली आहे.

 

लैला शेख या शिरुर तहसीलदार (Tehsildar Laila Dawal Shaikh) पदावर कार्यरत असताना तळेगाव ढमढेरे येथील शासकीय धान्य गोदामातून अवैध गौण खनिजाचे उत्खनन/वाहतूक केल्याच्या कारणावरुन जप्त केलेली चार वाहने पळवून नेण्यात आली होती. तसेच काही प्रकरणात जाणिवपूर्वक कमी दांडाची आकारणी करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गौण खनिजाचे परिणाम मोजून त्यामध्ये कमी परिणाम दाखवून कमी दंडाची (Penalty) आकरणी केली.

 

 

याशिवाय वाहन तपासणी करताना जप्त केलेल्या गौण खनिज पंचनाम्यामध्ये वाळू असे नमूद असून देखील ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पडताळणीसाठी पाठवल्यानंतर त्यामध्ये क्रशसँड असल्याचा अहवाल आल्यानंतर ते सोडून देण्यात आले. अशा अनेक तक्रारी लैला शेख यांच्या विरुद्ध विभागीय आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या.

 

विभागीय आयुक्तांनी तक्रारी अहवाल शासनाला सादर केला होता.
यामध्ये लैला शेख यांनी तहसीलदार म्हणून काम करत असताना
आवश्यक ते गांभीर्य राखले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
तसेच शेख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन कारवाई होईपर्यंत
त्यांची इतरत्र बदली करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांनी अहवालातून केली होती.
विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालाला महसूल व वन विभागाने मंजूरी देऊन लैला शेख यांची सोलापूर येथे बदली केली आहे.

 

Web Title :- Tehsildar Laila Dawal Shaikh | transfer of Laila Shaikh, Tehsildar of Shirur in pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा