‘या’ उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याने प्रशासनाच्या व्यवस्थेवरच केला ‘सवाल’ ; ट्रेनिंगमध्ये शिकवतात ‘चाटुगिरी’, प्रचंड खळबळ

दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशच्या श्योपुरमधील पदस्थ तहसीलदार अमिता सिंह चांगल्याच चर्चेत आहेत. या महिला अधिकाऱ्याने प्रशासनाच्या व्यवस्थेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये तहसीलदारांना फक्त हुजरेगिरी करत भ्रष्टाचार करणारे म्हणून संबोधले आहे. असे त्यांनी लिहिले आहे अकॅडमीमध्ये कामाच्या प्रती कोणाला निष्ठा नाही तर इथे फक्त हुजरेगिरी आणि भ्रष्टाचाराची ट्रेनिंग दिली जात आहे.

मध्यप्रदेशच्या तहसीलदार अमिता सिंह यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात की हुजरेगिरी आणि आणि भ्रष्टाचाराने माखलेली हि शासकीय सेवा आहे. कार्यरत असलेल्या तहसीलदारांना भ्रष्ट सांगत त्यांनी अशा व्यवस्थेची किळस येत असल्याचे लिहिले आहे.

आपल्या पोस्टमध्ये अमिता सिंह यांनी श्योपूरच्या कलेक्टरवरती सुद्धा ताशेरे ओढले आहेत. त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, आमच्यासारख्या अनुभवी तहसीलदारांना हटवून इतर नव्या तहसीलदारांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत आणि वरिष्ठ अधिकारी अशा तहसीलदारांना आपल्या गाडीमध्ये घेऊन फिरत आहेत.

जिल्ह्यातील बाकी ठिकाणी अनुभवी तहसीलदारांना कामे सोपवली जात आहेत मात्र इथं उच्च अधिकारी नव्या तहसीलदारांना सर्व काही देत आहेत. सगळे नियम आणि कायदे टांगून यांनाच प्राथमिकता दिली जात आहे. कारण हे ट्रेनींगमध्ये वरिष्ठांना पटवण्याची आणि त्यांची हुजरेगिरी करण्याची कला शिकून आलेले आहेत.

त्यांनी लिहिले आहे की ट्रेनिंगमध्ये काम करण्याची क्षमता वाढवण्यासंबंधी शिकलो होतो मात्र मागील एक दोन बॅचेसच्या तहसीलदारांन सोबत काम करून असे वाटते की आता अकॅडमीमध्ये काम, प्रतिष्ठा आणि शिस्तीची ट्रेनिंग दिली जात नाही तर हुजरेगिरी आणि भ्रष्टाचाराची शिकवण दिली जात आहे.

कोण बनेगा करोडपतींमुळे अमिता सिंह चर्चेत –

२०११ साली अमिता सिंह यांनी कोण बनेगा करोडपातीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या सोबत हॉट सीट वर बसून ५० लाख रुपये जिकंले होते तेव्हापासून त्या मोठा चर्चेचा विषय बनल्या होत्या.

आरोग्यविषयक वृत्त