‘कोरोना’मुळं मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांनी फिरवली पाठ, 15 तास पडून होता मृतदेह, अखेर तहसिलदारांनी दिला मुखाग्नी

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातून माणुसकीला लाजवणारी घटना समोर आली आहे. कोरोनानं मरण पावलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांनी 15 तास तसाच ठेवला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार देखील केले नाहीत.

पुसद येथे चौकीदाराचं काम करणाऱ्या एका व्यक्तीचा कोरोनामुळं मृत्यू झाला. नंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यामुळं त्याच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह तसाच राहू दिला. 15 तास उलटल्यानंतरही त्याच्यावर अंत्यंसस्कार केले नाही. ही बाब तहसिलदार वैशाख वाहुरवाघ यांना माहिती पडल्यानंतर त्यांनी पुढाकार घेत स्वत: या व्यक्तीच्या मृतदेहाला मुखाग्नी दिला.

तहसिदार वाहुरवाघ यांनी केलेल्या या कामामुळं सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक होताना दिसत आहे. कोरोनामुळं मरण पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेहाकाडे पाठ फिरवल्यावरही त्यांनी अंत्यसंस्कार करून पुत्रकर्तव्य पार पाडलं असं सर्व लोक बोलत आहेत.

मृत व्यक्ती हा खासगी चौकीदारी करून उदरनिर्वाह भागवत होता. त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. तपासणीचा अहवाल येईलपर्यंत तो होमक्वारंटाईन होता. ज्या दिवशी तपासणी केली त्याच रात्री त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. हे माहित पडल्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहाकडे पाठ फिरवली होती आणि त्याच्याकडे फिरकूनही पाहिलं नाही. इतर कुणाला कळवण्याचं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like