विमानासारख्या सुविधा मिळणार्‍या तेजस रेल्वेमध्ये आता मिळणार ‘ही’ सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली ते लखनऊ दरम्यान चालवण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या खासगी रेल्वे तेजसमध्ये आता प्रवाशांना RO चे पाणी पिण्यासाठी देण्यात येईल. IRCTC ने ही नवी योजना आणली आहे. याअंतर्गत रेल्वेत बॉटल बंद पाणी देणे बंद करण्यात येईल आणि त्याजागी RO चे पाणी पिण्यासाठी देण्यात येईल. RO तून वाया जाणाऱ्या पाण्याचा पुन्हा वापर करण्यात येणार आहे. यासाठी RO ला एक मिनी टँक जोडण्यात येईल. त्यात वाया जाणारे पाणी जमा होईल.

ही पहिली खासगी रेल्वे असेल. ही प्रायोगिक तत्वावर IRCTC ला चालवण्यास देण्यात आली आहे. याचे तिकिट देखील IRCTC ठरवेल.

वाया जाणाऱ्या पाण्याचे काय होणार –
ही वाया जाणारे पाणी रिसायकल करण्यात येईल. हे पाणी नंतर रेल्वे वॉशिंगसाठी आणि डस्टिंगसाठी वापरण्यात येईल. रेल्वेचा अंदाज आहे की, प्रत्येक फेरीत 1000 लीटरपर्यंत पाणी वाचेल. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तेजसमध्ये RO लावण्यात येईल.

तेजस रेल्वेचा प्रवास विमान प्रवासासारखा –
या रेल्वेत प्रत्येत सीटाला LCD स्क्रीन लावण्यात आली आहे. प्रत्येक सीटाला अटेंडेट बटन लावण्यात आले आहे, ज्याला दाबून तुम्हाला हवी असलेली सेवा उपलब्ध करुन दिली जाते.

रेल्वेत LED लाइट लावण्यात आली आहे, सिगरेट स्मोकिंग डिटेक्ट करण्यासाठी ऑटो डिटेक्टर लावले आहे. या रेल्वेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. प्रत्येक सीटावर चार्जिंग आणि यूएसबी केबल लावण्यात आली आहे. ही रेल्वे IRCTC ला चालवण्यास देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –