48 हजार कोटींच्या मेगा डिलवर कॅबिनेटचे शिक्कामोर्तब, 83 ’तेजस’ हवाईदलात होणार सहभागी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुरक्षा प्रकरणांच्या कॅबिनेट समिती (सीसीएस) ने बुधवारी हवाईदलात 83 तेजस हलक्या लढाऊ विमानांच्या प्रवेशाचा मार्ग खुला केला आहे. हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने बनवलेल्या या विमानांसाठी 48 हजार कोटी रुपयांची डिल करण्यात आली आहे. ही भारताची आतापर्यंतची सर्वात मोठी स्वदेशी संरक्षण खरेदी आहे.

पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील कमिटीची फायनल डिल
मार्च 2020 मध्ये डिफेन्स अ‍ॅक्विजिशन कौन्सिलने 83 अडव्हान्स्ड मार्क 1अ व्हर्जन तेजस विमानांच्या खरेदीवर शिक्कामोर्तब केले होते. आता पीएम मोदींच्या अध्यक्षतेखालील सीसीएसने ही डिल फायनल केली आहे.

संरक्षण मंत्र्यांनी ट्विट करून दिली माहिती
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले आहे की – पीएम मोदींच्या अध्यक्षतेखालील सीसीएसने आज ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात मोठी स्वदेशी संरक्षण डिल पूर्ण केली आहे. ही डिल 48 हजार कोटी रुपयांची आहे. यातून आपल्या हवाई दलाच्या ताफ्याची ताकद स्वदेशी ’एलसीए तेजस’द्वारे मजबूत होईल. भारताच्या डिफेन्स मॅन्यूफॅक्चरिंगसाठी ही डिल गेम चेंजर ठरेल.

त्यांनी लिहिले की, तेजस विमान पुढील वर्षांमध्ये भारतीय हवाई दलासाठी ’बॅकबोन’ ठरणार आहे. एचएएलने आपली सेकंड लाइन मॅन्यूफॅक्चरिंग सेटअपची सुरुवात नाशिक आणि बेंगळुरु डिव्हिजनमध्ये सुरू केली आहे. ही डिल अगोदर केलेल्या 40 लढाऊ विमानांच्या डिलपेक्षा वेगळी आहे. ही विमाने पुढील सहा ते सात वर्षात देशाच्या हवाई दलात सहभागी होतील.