देशातील पहिली खासगी ट्रेन ‘तेजस एक्सप्रेस’ ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारतातील रेल्वेचे जाळे अधिक गुंतागुंतीचे आणि मोठे आहे. तसंच अधिकाधिक नफा करून देणारे प्रवासाचे साधन आहे. या भारतीय रेल्वेच्या खासगीकरणासाठी केंद्र सरकारने काही पाऊल उचलले आहे. अर्थसंकल्पात यासंबंधीचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. आता त्यावर अंमलबजावणी होत आहे. दिल्लीहून लखनऊला जाणारी ‘तेजस एक्स्प्रेस’ ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार आहे.

‘तेजस एक्स्प्रेस’ला खासगी रेल्वे ठरवण्यासाठी प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडण्यात आला होता. त्यावर १० जुलैपर्यंत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती ‘आयआरसीटीसी’ने दिली आहे. हा निर्णय सकारात्मक असल्यास ‘तेजस एक्स्प्रेस’ ही देशातील पहिली खासगी रेल्वे होणार आहे.

‘तेजस एक्स्प्रेस’ ताशी २०० किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे आहे. तेजस एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्यासाठी तब्बल ३ कोटी २५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली ट्रेन आहे की ज्या ट्रेनला स्वयंचलित प्लगसारखे दरवाजे लावण्यात आले आहेत. म्हणजेच मेट्रोसारखे या ट्रेनचे दरवाजे आपोआप उघडतील व बंद होतात. या रेल्वेचे नाव ‘तेजस’ असल्याने रेल्वेच्या डब्याला सूर्यकिरणाचा रंग देण्यात आला आहे.

दरम्यान, रेल्वेसाठी घेतलेल्या प्रस्ताव १०० दिवसांच्या अजेंड्याला पूर्ण करण्याची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे. सुरुवातीला देशात दोन खासगी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. रेल्वेत खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलली असली तरी ‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे मेन’ (NFIR) ने यावर विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय