तेजश्री प्रधानची बॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’, पहिल्याच सिनेमात दिले लिपलॉक ‘Kissing सीन्स ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान आपला बॉलिवूड डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी मालिका, नाटक आणि सिनेमात काम करणारी तेजश्री लवकरच बॉलिवूडमध्ये काम करताना दिसणार आहे. लवकरच तेजश्री बबलू बॅचलर या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास बात अशी की या सिनेमात तेजश्री अभिनेता शर्मन जोशीसोबत काम करताना दिसणार आहे. तेजश्रीनं आपल्या या पहिल्याच सिनेमात बोल्ड सीन्स दिले आहे. बबलू बॅचलर या सिनेमाचा ट्रेलरही काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे.

https://www.instagram.com/p/B8Q29ylFxB6/

तेजश्रीच्या बबलू बॅचलर या सिनेमात तिचा बोल्ड अवतार दिसणार आहे. आतापर्यंत साध्या लुकमध्ये दिसणारी तेजश्री आता वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. आपल्या पहिल्याच सिनेमात तेजश्रीनं लिपलॉक किसिंग सीन दिला आहे. ट्रेलरमध्ये शर्मन आणि तेजश्रीचा किसिंग सीन पहायला मिळत आहे. तेजश्रीनं सिनेमाचं पहिलं पोस्टरही इंस्टाग्रामवरून शेअर केलं होतं. चाहत्यांनी तिला सिनेमासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या. परंतु तेजश्रीचा बोल्ड अंदाज मात्र चाहत्यांच्या कितपत पचनी पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ट्रेलरनं आता चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढवली आहे.

तेजश्री आणि शर्मन यांनी यापूर्वीही एकत्र काम केलं आहे. दोघे हिंदी नाटकात एकत्र दिसले आहेत. आता लवकरच ही जोडी पडद्यावर दिसणार आहे. बबलू बॅचलर या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं दिग्दर्शन अग्निदेव चॅटर्जी यांनी केलं आहे. हा सिनेमा 20 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळं ते काही शक्य झालं नाही.

https://www.instagram.com/p/B8XtTyKlCll/

तेजश्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती अग्गंबाई सासूबाई या मालिकेत सध्या काम करत आहे. या मालिकेत ती शुभ्राची भूमिका साकारत आहे. तिची भूमिकाही चाहत्यांना खूप आवडत आहे.