Tejasswi Prakash | अभिनेत्री तेजस्वीचे ब्लॅक शिमरी ड्रेसमधील फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला (Tejasswi Prakash) सध्या वेगळ्या अशा ओळखीची काहीच गरज नाही. टीव्ही विश्वात एक प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तेजस्वीचे नाव आवर्जून घेतले जाते. तेजस्वी सोशल मीडियावर देखील खूपच सक्रिय असते. तिचे अनेक फोटोज व्हिडिओज ती सतत शेअर करत असते. नुकतेच तिने तिचे नवीन फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकले आहेत. या फोटोमध्ये तेजस्वी (Tejasswi Prakash) खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. या फोटोतील तिच्या ड्रेसने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
तेजस्वी आपल्या अभिनयाने इतकी प्रसिद्ध झाली नाही की जितकी तिने बिग बॉस मध्ये सहभागी होताच प्रसिद्धी मिळवली. बिग बॉसमध्ये सहभाग घेतल्यानंतर तिने तिच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता तेजस्विनीने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तेजस्विनीने पूर्ण ब्लॅक थीम करत तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेस मध्ये तिचा थाय हाय कट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या लूकमध्ये तिने ब्लॅक हिल्स कॅरी करत केस मोकळे सोडत न्यूड मेकअप करत सर्वांचेच लक्ष आकर्षित केले आहे. या फोटोमध्ये तेजस्विनीने कर्वी फिगर करत एकापेक्षा एक पोजेस देत फोटो शेअर केले आहेत. सध्या तेजस्वीच्या या फोटोवर कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोवर चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजींचा वर्षाव केला आहे.
तर अनेकांना तेजस्वीचे (Tejasswi Prakash) हे लूक भावल्याचे देखील दिसत आहे.
तेजस्वीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास बिग बॉस 15 नंतर तेजस्विनीला अनेक प्रोजेक्ट मिळायला सुरुवात झाले.
‘नागिन 6’ सोबतच ती सध्या अनेक प्रोजेक्टमध्ये दिसत आहे.
याव्यतिरिक्त गेल्याच वर्षी ती एका मराठी फिल्म मध्ये देखील दिसून आली होती.
Web Title :- Tejasswi Prakash | television tejasswi prakash sizzles in black shimmery dress actress looted attraction with her thigh high cut
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update