‘तेजस्विनी’ ठरतेय देशासाठी आदर्श

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- गेल्या वर्षी जागतीक महिला दिना निमित्त पीएमपीने महिला प्रवाश्यांच्या सोयीसाठी सुरू केलेली तेजस्विनी बससेवा देशासाठी आदर्श ठरत आहे. सध्या एकुण ३८ बसमार्फत ही सेवा दिली जात असून मार्च अखेरपर्यंत आणखी २७ बसची त्यात भर पडणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बस सेवा उपलब्द् करुन देणारी खास महिलांसाठी बससेवा पुरविणारी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ही देशातील पहिलीच सार्वजनिक संस्था असल्याचे पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सांगितले.

सध्या पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये १४ मार्गांवर ही बससेवा सुरू आहे. एकुण ३८ बसच्या माध्यमातून दररोज या बससेवेच्या ४६४ फेऱ्या होत असतात. मागील महिन्यात शासनाच्या अत्याधुनिक ६ तेजस्विनी बस ताफ्यात दाखल झाल्या. मार्च २०१८ पासून आतापर्यत तेजस्विनी बसमधून प्रति महिना २ लाख ३३ हजार तर वर्षभरात २८ लाख महिलांनी प्रवास केला आहे. यातुन प्रति महिना ३४ लाख ३७ हजार तर वार्षीक ४ कोटी १२ लाख ५२ हजार रुपयांचे मिळाले आहे. पीएमपीला प्रति किलोमीटर ३३ रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. सर्व बसमध्ये महिला वाहकांचीच नेमणुक करण्यात आली आहे. तिकीट तपासणीसाठी दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. टप्प्याटप्याने आणखी २७ बस पीएमपीला मिळणार आहेत. त्यामुळे तेजस्विनीच्या ताफ्यात आणखी भर पडणार आहे.

जागतिक महिला दिनी तेजस्विनी बससेवेला वर्ष पुर्ण होत आहे. मागील वर्षभरात या सेवेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मागील वर्षी जागतिक महिला दिनी ‘पीएमपी ’ ने तेजस्विनी ही बससेवा सुरू केली. त्यापूर्वीही पीएमपीकडून खास महिलांसाठी विशेष बससेवा होती. मात्र, बसचे प्रमाण कमी होते. राज्य शासनाने पुण्यासह अन्य काही शहरांमध्ये खास महिलांसाठी बस पुरविण्याचा निर्णय घेतला. या सेवेला तेजस्विनी नाव देण्यात आले. याअंतर्गत पीएमपी प्रशासनाने ही मागील वर्षी ही सेवा सुरू केली. मात्र, शासनाकडून बस वेळेत उपलब्ध न झाल्याने पीएमपीच्या ताफ्यात आलेल्या मिडी बसच्या माध्यमातून महिलांना बस उपलब्ध करून देण्यात आल्या. या सेवेला महिलांचा प्रतिसाद वाढत गेल्याने टप्प्याटप्याने बस, फेऱ्या व मार्ग वाढविण्यात आले. आता दर महिन्याच्या ८ तारखेला ही सेवा मोफत दिली जाणार आहे.

ह्याहि बातम्या वाचा

भोंदु बाबाकडे घेऊन जाऊन विवाहितेचा छळ

सुरत-नागपूर महामार्गावर विचित्र अपघात, दोन ठार

अक्षय कुमारचा मोठा निर्णय, ‘केसरी’ मधून पाक गायकाची हकालपट्टी

१ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी उपअभियंत्याला शिक्षा

#एअर स्ट्राईकमध्ये वापरली होती अत्यंत घातक अस्त्र