Tejaswini Pandit Birthday : एकेकाळी जेवायला देखील नव्हते पैसे : तेजस्विनी पंडित

मुंबई : वृत्तसंस्था – आपल्या अभिनयाच्या बळावर सगळ्यांच्या मनात घर करणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म पुण्यात झाला. बर्थडे निमित्त तिने काही भावनिक क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहे. वाईट परिस्थितीवर मात करुन आपली छाप टाकणारी अभिनेत्रीने मराठी चित्रपटसृष्टीत चांगलेच नाव कमावले आहे. तिने एक गोष्ट शेअर केली आहे.

तेजस्विनीने सांगितले की. माझ्या आयुष्यात एक वाईट क्षण आला. ज्याचा कोणी विचार करु शकत नाही. त्यावेळी मागे न पडता मी त्या परिस्थितीला सामोरी गेले. आमच्यावर अशी वेळ आली की, घरात जेवायला पैसे नव्हते. घरात काहीच सामान नसल्याने काय करायचे कळत नव्हते त्यावेळी आम्ही मैद्याची बिस्किटे खाऊन तीन दिवस काढले. इतकेच नाही तर वीज बिल भरायला देखील पैसे नव्हते. ते दिवस आम्ही अंधारात काढले.

तेजस्विनी आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण तिचा आधीचा प्रवास सोपा नव्हता. तिची आई ज्योती चांदेकर ही पण प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आई अभिनेत्री असली तरी तिची आर्थिक परिस्थिती वाईट होती. तरीही त्यांनी परिस्थितीशी झगडून आपले स्थान निर्माण केले.

आईच्या पावलावर पाऊल ठेवून तेजस्विनीने केदार शिंदेचा चित्रपट ‘अगं बाई अरेच्चा’ मध्ये करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. यानंतर तिने गैर, तु ही रे, देवा, ये रे ये रे पैसा, मी सिंधुताई सपकाळ अशा अनेक चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.

अनेक चित्रपटात तेजस्विनीच्या अभिनयाचे कौतुक केले. तेजस्विनीने अभिनेत्री अभिज्ञा भावेसोबत तेजाज्ञा या डिझाइनर ब्रॅंडला चार वर्षापूवी सुरुवात केली होती. हा ब्रॅंड सध्या खूप लोकप्रिय आहे.