तेजस्विनी पंडितनं दुबईच्या गार्डनमधून शेअर केले फोटो ! चाहत्यांना आवडला ग्लॅमरस ‘लुक’

पोलीसनामा ऑनलाइन – अ‍ॅक्ट्रेस तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) कायमच सोशलवर सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती कायमच चाहत्यांसोबत शेअर करत असते. आपल्या काही फोटोंमुळं ती चर्चेत आली आहे.

तेजस्विनीनं तिच्या इन्स्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो दुबईतील मिरॅकल गार्डनमधील आहेत. तेजस्विनीच्या फोटोत दिसणारा सुंदर फुलांचा नजारा पाहण्यासारखा आहे. सध्या ती दुबईत आहे. ती शूटिंगसाठी गेली आहे की, व्हॅकेशनसाठी हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या तिच्या फोटोंची मात्र खूप चर्चा होताना दिसत आहे.

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनीही तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे. अनेक चाहत्यांना तिचा लुक आवडला आहे.

तेजस्विनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेंच्या सिनेमातून तिनं करिअरला सुरुवात केली होती. मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे अशा काही सिनेमात तिनं काम केलं आहे. ती 100 डेज या मालिकेतही दिसली आहे. इतकंच नाही तर नाटकं आणि लहान पडद्यावरदेखील तिनं भूमिका साकारल्या आहेत.