‘मॉनिटर’ होता आलं नाही म्हणून ८ वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; २ दिवसानंतर रेल्वे रूळावर आढळला मृतदेह

तेलंगणा : वृत्तसंस्था – तेलंगणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील आठवीत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. तेलंगणातील भोंगिर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. गुरुवारी मुलगा हरवल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केली होती. या घटनेविषयी बोलताना पोलिसांनी सांगितले कि, वर्गातील मॉनिटरच्या निवडणुकीत पराभव झाल्याने या मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले.

चरण असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. १९ जुलै रोजी रमन्नापेटजवळ रेल्वे रुळांवर या विद्यार्थ्याचा मृतदेह मिळून आला. पोलीस उपाधीक्षक रेड्डी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आम्हाला एक मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर तात्काळ आम्ही याचा तपास सुरु केला. यावेळी तपासात आम्हाला रमन्नापेटजवळ रेल्वे रुळांवर या विद्यार्थ्याचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर घटनास्थळी जाऊन आम्ही मृतदेह ताब्यात घेतला.

दरम्यान, मृतदेहाची उत्तरीय तपासणी पूर्ण झाली असून त्याच्या आई वडिलांनी शाळेविरोधात तक्रार दाखल केली तर त्याविषयी गुन्हा नोंदवला जाईल.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like