धक्कादायक ! महिला तहसीलदारास कार्यालयात घुसून पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात एका महिला तहसीलदाराला कार्यालयात घुसून तिला जिवंत जाळण्याची भयानक घटना घडली आहे. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या विजया या महिला तहसीलदाराचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की सोमवारी दुपारी एक जण तहसीलदार कार्यालयात आला आणि त्याने तहसीलदार विजया यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी तहसीलदार तिच्या कार्यालयात एकटीच होती. एक व्यक्ती तहसिलदार कार्यालयात आली. त्यानंतर त्या व्यक्तीने तहसिलदार विजया यांच्यावर पेट्रोल टाकून आग लावून दिली. पेटल्यानंतर तहसिलदार ओरडत खोलीतून बाहेर आली तिथल्या कर्मचार्‍यांनी तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला.

मात्र मोठ्या प्रमाणात भाजल्यामुळे कर्मचाऱ्यांना तहसीलदार महिलेला वाचवण्यात यश आलं नाही. या महिला तहसिलदाराचा जागीच मृत्यू झाला. महिला तहसिलदाराला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीलाही गंभीर स्वरूपात भाजले आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Visit : Policenama.com