ज्यांना हिंदू संपवायचेत त्यांच्या सभापतींकडून मी शपथ घेणार नाही ; भाजप आमदाराचे वक्तव्य

हैदराबाद : तेलंगणा वृत्तसंस्था – तेलंगणामधील भाजपचे एकमेव आमदार राजा सिंह हे नेहमीच वादाच्या भोवाऱ्यात असतात. पुन्हा एकदा त्यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. एमआयएमचे नेते आणि तेलंगणा विधानसभेच्या हंगामी सभापतींकडून त्यांनी शपथ घेण्यास नकार दिला आहे. एमआयएमचे पाच वेळा झालेले आमदार मुमाताज अहमद खान यांची शनिवारी रात्री हंगामी सभापती म्हणून निवड झाली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे एमआयएमच्या हातातील खेळणे आहे, असा गंभीर आरोप राजासिंह यांनी केला आहे. एमआयएमला हिंदूंना संपवायचे आहे, असंही त्यांनी म्हटलं.

 मी अशा हंगामी सभापतीकडून शपथ घेऊ इच्छित नाही, ज्यांच्या पक्षाला हिंदू संपवायचा आहे. ते कधी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ म्हणत नाहीत, असे राजासिंह यांनी म्हटले.

राजासिंह पुन्हा एकदा नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. तेलंगणा विधानसभेचे पहिले अधिवेशन १७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. विधानसभेतील सर्वांत ज्येष्ठ सदस्य मुमताज अहमद खान १६ जानेवारी रोजी हंगामी सभापती म्हणून शपथ घेतील.