आर्श्‍चयकारक ! आईच्या ‘आर्त’ हाकेने ‘तिर्डी’वर झोपलेल्या मुलाच्या डोळयात ‘आश्रू’, दृश्य पाहून डॉक्टरांची उडाली ‘भंबेरी’

हैदराबाद : वृत्तसंस्था – एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केले आणि त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु झाली, आणि मग आईच्या आक्रोशाने अचानक मेलेला मुलगा जिवंत होतो. असं काहीसं फक्त आणि फक्त चित्रपटातच होऊ शकते. हैदराबादमध्ये अशी घटना खऱ्याने घडली आहे. तेलंगणाच्या सूर्यापेटमध्ये राहणार्‍या १८ वर्षांच्या मुलाला डॉक्टारांनी मृत घोषित केले होते. त्याच्या अंत्यसंस्काराची सर्व तयारीही करण्यात आली होती. मात्र एक चमत्कार झाला आणि अखेर तो जिवंत झाला.

मरणावस्थेतून परत येणाऱ्या या मुलाचे नाव गंधम करिन असं आहे. त्याला अचानक ताप आला होता. त्यात त्याला अचानक उलट्याही सुरु झाल्या. त्यामुळे त्याला २६ जूनला रुग्णालयात हलवण्यात आले. हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र त्यांची तब्येत अधिकच गंभीर होती. त्यामुळ तो कोमामध्ये गेला होता. कोमात असलेल्या गंधमवर ५ दिवस उपचार करण्यात आले. मात्र त्याच्या तब्येतीत कोणताही फरक जाणवला नाही. गंधमच्या तब्येतीत कोणताही सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्याचा ब्रेन डेड झाल्याचे सांगितले. गंधमच्या कुटुंबाला त्याला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

एखाद्या व्यक्तीचा ब्रेन डेड झाला असेल तर तो पुन्हा जिवंत होईल की नाही हे सांगता येत नाही. आणि गंधमचा ब्रेन डेड झाला म्हणजे त्याचा मृत्यूच झाला आहे, असा समज त्याच्या कुटुंबाचा झाला. त्यामुळे गंधमच्या घरच्यांनी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारीही सुरु केली होती. गंधमचे शव चितेवर ठेवण्याआधी खाली ठेवण्यात आले. त्यावेळी त्याची आई त्याच्याजवळ बसून आक्रोश करू लागली. आपल्या आईचा आक्रोश ऐकून गंधमच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. हे पाहून नातेवाईकांनी पुन्हा डॉक्टरांना बोलवलं. तेव्हा डॉक्टरांनी गंधम जिवंत असल्याचे सांगितलं.

दरम्यान, जेव्हा गंधमवर उपचार करण्यात आले. तेव्हा गंधमच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. आता गंधम कुटुंबातील लोकांशी बोलूही लागला आहे. हा केवळ एक चमत्कारच म्हणावा लागेल.

आरोग्यविषयक वृत्त

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय