Telangana : पोलीस अधिकार्‍यांकडे 70 कोटीची अवैध संपत्ती, ACB च्या छाप्यात खुलासा

हैद्राबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   तेलंगना पोलिस दलातील एका अधिकार्‍याकडे 70 कोटी रूपयांची अवैध संपत्ती सापडली आहे. राज्याच्या अँटी करप्शन ब्यूरोने अनेक छाप्यानंतर याचा खुलासा केला आहे. नरसिम्हा रेड्डी नावाच्या या अधिकार्‍याने 1991 मध्ये एक इन्स्पेक्टर म्हणून पोलीस दल जॉइन केले होते. असिस्टंट कमिश्नर पदावर काही दिवसांपूर्वीच त्याला प्रमोशन मिळाले होते आणि तो मल्काजगिरीमध्ये कर्तव्यावर होता.

एसीबीने नरसिम्हा रेड्डीला स्पेशल कोर्टाच्या समोर हजर केले आहे. मेडिकल टेस्टनंतर त्याच्या रिमांडची मागणी करण्यात येईल. एसीबीचे डायरेक्टर जनरल पूर्णचंद्र राव यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रेसनोटनुसार, नरसिम्हा रेड्डीच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी राज्यातील 25 ठिकाणांवर छापे मारण्यात आले. हे छापे वारंगल, जनगाव, नालगोंडा, करीमनगर आणि आंध्र प्रदेशच्या अनंतपुर जिल्ह्यात मारण्यात आले. या छाप्यांमध्ये एसीबीला नरसिम्हा रेड्डीच्या मोठ्या संपत्तीचा खुलासा झाला आहे.

तेलंगनातील एका अन्य भ्रष्टचार प्रकरणात सुद्धा एसीबीने याच महिन्यात मोठी कारवाई केली होती. इंश्युरन्स मेडिकल सर्व्हिसेस (आयएमएस) चे माजी संचालक आणि अन्य एका अधिकार्‍याशी संबंधीत 4.47 कोटी रुपयांची अघोषित रक्कम जप्त केली होती. आयएमएसच्या माजी संचालक देविका रानी यांची 3.75 कोटी रूपयांची अघोषित रक्कम आणि ईएसआय फार्मासिस्ट नागा लक्ष्मीची 72 लाख रुपयांची रक्कम जप्त केली. ही रक्कम कमर्शियल आणि निवासी संपत्ती खरेदी करण्यासाठी येथे सायबराबाद परिसरात एका रियल इस्टेस्ट कंपनीत गुंतवण्यात आली होती.

दोन्ही अधिकार्‍यांनी केली होती अघोषित रकमेची गुंतवणूक

दोन्ही अधिकार्‍यांनी सहा निवासी फ्लॅट तसेच आपल्या कुटुंबियांच्या नावाने सुमारे 15,000 स्क्वेअर फुटाची कमर्शियल संपत्ती खरेदी करण्यासाठी अघोषित रक्कम गुंतवली.