जमीन खोदताना आला ‘आवाज’ अन् ‘शेतकरी’ झाला मालामाल, जाणून घ्या प्रकरण

तेलंगणा : वृत्तसंस्था –  तेलंगणा येथील जनगाव जिल्ह्यातील पेमबर्थीमध्ये एका शेतकऱ्याला जमीन खोदताना एक मोठं भांड सापडलं आहे. त्या भांड्यात तब्बल ५ किलो सोन्याचे दागिने सापडले आहे. नरसिंह असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. आज (गुरुवारी) तेथील एका ओसाड जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरु होते. त्यावेळी खोदकाम सुरू असताना मातीतून सोन्याचे दागिने पडू लागल्याचे आढळले.

जमिनीतून सापडलेल्या सोन्याचे दागिने सुमारे ५ किलो इतके आहे. तर त्याची किंमत तब्बल करोडोमधे आहे. हे सोन्याचे दागिने ऐतिहासिक आहे. याचे दर २ कोटी आहे. मात्र अँटीक वस्तूंच्या बाजारात याची किंमत न सांगता येण्यासारखी आहे. शेतकरी नरसिंह याला सोन्याचे भांडे मिळाल्याचे वृत्त प्रसारित झाल्याने हा सोन्याचा हंडा बघण्यासाठी अनेक शेकडो नागरिकांची जंगलात गर्दी झाली होती.

दरम्यान, हि माहिती प्रशासनाला मिळाल्याने पोलिसांसह महसूलचे अधिकारीही दाखल झाले. त्यांनी हे सोने ताब्यात घेऊन निरिक्षणासाठी पाठविले आहे.

शेतकरी नरसिंह यांनी १ महिन्यापूर्वीच ही ११ एकर जमीन खरेदी केली होती. ती जमीन शेतीयोग्य बनविण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण सुरु आहे. हा खजिना काकतीय साम्राज्याच्या वेळच असल्याचे म्हटले आहे. काकतीय साम्राज्याची राजधानी वारंगळ होती. काही वर्षांपूर्वीच आता वेगळा जिल्हा बनविण्यात आला आहे. आता हा खजिना ऐतिहासिक निघाला तर शेतकरी नरसिंह याना त्याच्या एकूण किंमतीचा काही भाग बक्षीस म्हणून मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्याचा जमीन खरेदीचा खर्च वसूल होणार असल्याची चर्चा सुरु आहे.