सरकारी अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी शेतकऱ्याने मागीतली भीक

हैदराबाद : तेलंगणा वृत्तसंस्था – बसावैया (वय ७५) आणि पत्नी लक्ष्मी हे शेतकरी दांपत्य सध्या गावो गावी भीक मागून पैसे गोळा करत आहे. एका सरकरी अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी एका शेतकऱ्याला चक्क भीक मागण्याची वेळ येते आहे यासारखी दुर्दैवी घटना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या जवळ पासच्या काळात घडने हि लाजिरवाणी बाब आहे.

तेलंगणामधील जयशंकर भूपलपल्ली जिल्ह्यातील शेतकरी बसावैया यांना पासबुक हवे आहे. पासबुक काढण्यासाठी बसावैया यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारा जवळ चौकशी केली मात्र पासबुक देण्यासाठी तुम्ही मला एक लाख द्या अशी मागणी तहसीलदार के. सत्यानारायण याने बसावैया यांना केली आहे. म्हणून एक लाख रुपये देण्यासाठी बसावैया (वय ७५) आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी या भीक मागत होत्या.

तहसीलदार कार्यालयात बसावैया यांनी पासबुकासाठी विनंती केली. त्यांनी स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे हि संबंधित अधिकाऱ्याला सांगितले मात्र या अधिकाऱ्याने त्यांचे काहीच ऐकून घेतले नाही. शेवटी नाविलाज झाल्याने त्यांनी भीक मागायला सुरुवात केली. तर आपल्या जमिनीवर संबंधित तहसीलदार इतर लोकांची नावे लावणार होता असा आरोप देखील बसावैया या शेतकऱ्याने लावला आहे. शेतकरी अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी भीक मागत आहे असे त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला समजताच जिल्हाधिकारी वसम वेंकटेश्वरलू यांनी शेतकऱ्याला आपल्या कार्यालयात बोलवून घेतले आणि त्याच्या प्रकरणाची कागदपत्रे तपासून पहिली आणि तपासणी अंती त्या शेतकऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी पासबुक देऊ केले.

दरम्यान संबंधित तहसीलदाराने आपण कसल्याही पध्द्तीची लाच या शेतकऱ्या कडून मागितली नाही असा दावा केला आहे. तर जमिनीचा एक भाग वादात असल्याने त्याची चौकशी सुरु आहे त्या चौकशी संदर्भात कार्यवाही पूर्ण होत नव्हती म्हणून आपण पासबुक देत नव्हतो असे हि कारण तहसीलदाराने समोर केले आहे.