अबब ! दसर्‍याच्या मुहूर्तावर ‘ही’ कंपनी देणार तब्बल 48 हजार कर्मचार्‍यांना प्रत्येकी 1 लाख रूपये ‘बोनस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिकांच्या खरेदीचे प्रमाण वाढते. त्यामुळे कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देत असतात. सणांचा आनंद आपल्या कर्मचाऱ्यांना घेता यावा यासाठी कंपन्या हा प्रयत्न करत असतात. यावेळी देखील सिंगरेनी कोलियरीज कंपनी लिमिटेड म्हणजेच SCCL ने दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या कर्मचाऱ्यांना 1.01 लाख रुपये बोनस घोषित केला आहे. हि कंपनी राज्य सरकारच्या अधीन येत असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी याबाबत बोलताना सांगितले कि, कंपनीने मागील पाच वर्षांत चांगला विकास केला आहे आणि याचे संपूर्ण श्रेय कर्मचाऱ्यांना जाते. त्यामुळे यांचे काम देखील सैनिकांपेक्षा कमी नाही, असे देखील म्हटले.

याविषयी अधिक बोलताना राव पुढे म्हणाले कि, या वर्षी कंपनी मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 40,000 रुपये अधिक बोनस देणार आहे. कंपनीच्या नफ्यामधून हा बोनस दिला जाणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक कर्मचाऱ्याला 1,00,899 रुपये बोनस मिळणार आहे. 48 हजार कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. हि उत्खनन कंपनी तेलंगणाच्या विकासात मोठे योगदान देत असल्याचे देखील राव म्हणाले. कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून याठिकाणी काम करत आहेत, त्यामुळे कंपनी इतका विकास करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

दरम्यान, 2013-14 मध्ये कर्मचाऱ्यांना 13,540 रुपये बोनस स्वरूपात दिले गेले होते. 2017-18 मध्ये 60,369 रुपये बोनसच्या रूपात दिले गेले होते. 2018-19 या आर्थिक वर्षात कंपनीने रेकॉर्डब्रेक 644.1 लाख टन कोळशाचे उत्पादन केले होते. त्यामुळे कंपनीने यावेळी कर्मचाऱ्यांना मोठा बोनस दिला आहे.

Visit – policenama.com 

 

You might also like