परीक्षा न देताच 10 वी ची सर्व मुलं पास होणार, ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय

हैदराबाद : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर काही वर्गाच्या परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. तेलंगना सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून, परीक्षा न देताच 10 वीची सर्व मुलं पास करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. कोरोनामुळे राज्यात एवढ्या मुलांची परीक्षा घेता येणार नाही, असं राज्य सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे सर्व मुलांना ग्रेड देऊन त्यांना पुढच्या वर्गात पाठवलं जाणार आहे. वर्षभरातल्या मुलांच्या प्रगतीवर त्यांना ग्रेड देण्यात येईल असे सरकारने म्हटले आहे.

तेलंगना राज्यात आज (सोमवार) पासून 10 वीची परीक्षा सुरु होणार होती. मात्र, हायकोर्टाने कोरोनामुळे परीक्षा घेण्याला स्थगिती दिली होती. देशातल्या अनेक राज्यांमध्ये आसाच प्रश्न निर्माण झाला असून फक्त फायनलमध्ये असणाऱ्या मुलांचीच परीक्षा कशा पद्धतीने घेता येईल यावर विचार सुरु आहे.

देशात लॉकडाऊन नंतर आता अनलॉक 1 सुरु झाले असून अनेक ठिकाणी जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये देशातील शाळांबाबत मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. 3 जून रोजी झालेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील शाळा आणि महाविद्यालयांबाबत मोठा खुलासा केला. कोरोनाच्या महासाथीत 16 मार्चपासून देशातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. ऑगस्ट 2020 नंतर शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.