धक्कादायक : ‘या’ विचित्र कारणामुळे मुख्याध्यापिकेने कापले 150 मुलींचे केस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगांमध्ये एक हैराण आणि चकित करणारी घटना समोर आली आहे. हॉस्टेलमध्ये पाणी नसल्याने तेथील आदिवासी  गुरुकुलमधील मुख्याध्यापिकेने या मुलींना बळजबरी हे केस कापायला लावले आहेत. के. अरुणा असे या मुख्याध्यापिकेचे नाव असून तिने बळजबरी १५० मुलींना हे केस कापण्यास भाग पाडले आहे.

या शाळेत पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांच्या या निर्णयानंतर विद्यार्थिनींनी त्यांच्याविरोधात मोठे आंदोलन केले. त्यानंतर या मुलींच्या आईवडिलांनी देखील या गरुकुलाला भेट देऊन आपल्या पाल्यांची चौकशी केली. मुलींनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी या मुख्यध्यापिकांनी दोन न्हाव्यांना बोलावून या मुलींचे केस कापले. त्याचबरोबर यासाठी मुलींकडून २५ रुपये देखील घेण्यात आले. मात्र के. अरुणा यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले असून साफसफाई आणि आरोग्यासाठी या मुलींचे केस कापण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अनेक मुलींना त्वचेचे आजार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले असून लवकरच  त्याचा तपास करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त