निजामाच्या ‘डायमंड रिंग’चा ५४ कोटीला ‘लिलाव’, १७ कोटीला विकला गेला ‘हिरे’ जडीत हार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात भारतीय ज्वेलरीचा लिलाव करण्यात आला, त्यातून भरपूर पैसे जमा झाले. असे असले तरी या लिलावात खास आकर्षण होते ते म्हणजे तेलंगणाचा निजाम मीर उस्मान अली खान यांचे दागिने.

या दागिण्यात रिंग, नेकलेसचा सहभाग होता, त्यात त्याच्या तलवारीचा देखील लिलाव करण्यात आला आहे. लिलावामध्ये निजामाचे सर्वात खास५२.५८ कॅरेटची डायमंड रिंगला ४५ कोटी रुपयांची बोली लावली होती. या रिंग (आंगठी) मिरर ऑफ पॅराडाइज मध्ये लावण्यात आलेला डायमंड गोवळकोंडाच्या प्रसिद्ध खाणीतून काढण्यात आला आहे.

निजामाच्या तलवारीचा लिलाव १३.४ कोटी –

याशिवाय निजामाच्या तलवारीचा लिलाव 13.4 कोटी रुपयांना करण्यात आला. लिलावात निजामाच्या खजिन्यातील खास हारावर सर्वांची नजर होती. हिऱ्यांने जडीत या हाराची 17 कोटी रुपयांना बोली लावण्यात आली. 33 हिऱ्यांनी बनलेल्या या नेकलेसने सर्व अनुमानांना मागे सोडले. हा हिरांनी जडीत नेकलेस 10.35 कोटी रुपयांमध्ये विकला जाऊ शकतो.

‘अर्काट 2’ डायमंड 23.5 कोटी रुपयांना लिलाव –

यावेळी निजाम परिवाराने लिलावाच्या प्रक्रियेकडे लक्ष ठेवले होते. जेणे करून खजाण्यात सामील असलेल्या अनमोल रत्नाच्या लिलावच्या किंमतीचा महिती कळेल. दिवंगत निजाम मीर उस्मान अली खान यांचे नातू मीर नजफ अली खान यांनी सांगितले की, जेव्हा पांढऱ्या नेकलेसचा लिलाव झाला होता, त्यावेळी जवळपास ओरडतच होतो. लिलावाच्या दरम्यान 17 कॅरेटचा गोवळकोंडाचा ‘अर्काट 2’ डायमंड 23.5 कोटी रुपयांना लिलाव करण्यात आला.

लिलावात 758 कोटींची कमाई –

लिलाव करणारी संस्था क्रिस्टीने दिलेल्या माहितीनुसार 400 वस्तूंचा लिलाव करण्यात आला. त्यातून 758 कोटी रुपये मिळाले. हा लिलाव भारतीय कला आणि मुघल वस्तूंची आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव सांगण्यात येतो. हा लिलाव जवळपास 12 तास चालला आणि भारत तसेच 44 अन्य देशांचे लोक लिलावत सहभागी झाली होती. सांगण्यात येत आहे की, जयपूर, इंदौर आणि बडोदा या शाही परिवार देखील लिलावाला उपस्थित होते.

आरोग्य विषयक वृत्त –

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा “पायलेट्स एक्सरसाइज”

जाणून घ्या “योगा” कधी करावा

हृदयदोष असलेल्या मुलास नानावटीच्या डॉक्टरांकडून जीवदान

Yoga Day 2019 :अमित शहांसोबत मनोहरलाल सरकार करणार योगभ्यास