‘पुरस्कार’ प्राप्त महिला तहसीलदाराच्या घरात ‘घबाड’ सापडलं ; १ कोटींसह अर्धाकिलो सोनं जप्‍त

हैद्राबाद : वृत्तसंस्था – तेलंगणा भ्रष्टाचार विरोधी पथकाने (ACB) पुरस्कार प्राप्त तहसीलदाराच्या घरावर छापा मारला. त्यावेळी घरामध्ये सापडलेले पैसे पाहून अधिकारी देखील चक्रावून गेले. व्ही. लावण्या या महिला तहसीलदाराच्या घरावर पथकाने धाड टाकली. व्ही. लावण्या यांना दोन वर्षापूर्वी सर्वोत्तम तहसीलदार हा पुरस्कार मिळाला होता. या कारवाईत अधिकाऱ्यांनी तब्बल ९३ लाख रुपयांची रोकड आणि ४०० ग्रॅम सोने जप्त केले आहे. काही दिवसांपूर्वी ग्राम महसूल अधिकाऱ्याला शेतकऱ्याकडून चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पडकले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

जमिनीच्या कागदपत्रांमधील चूक दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्याकडे आठ लाख रुपयांची लाच मागितीली होती. आठ लाखांपैकी पाच लाख रुपये तहसीलदारांना तर तीन लाख रुपये ग्राम महसूल अधिकाऱ्यासाठी होते. पैसे स्विकारताच ग्राम महसूल अधिकाऱ्याने तहहसीलदारांकडे संपर्क साधला. हा प्रकार भ्रष्टाचार विरोधी पथकाला समजताच त्यांची चौकशी केली.

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक शेतकरी व्ही. लावण्या यांच्या पाया पडत असून तो नोंदीमधील चुका दुरुस्त करून देण्याची मागणी करत होता. चुका दुरुस्त करून देण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्याने तीस हजार रुपयांची लाच मागितली होती. विशेष म्हणजे लावण्या यांना दोन वर्षापूर्वी तेलंगणा सरकारकडून सर्वोत्तम तहसीलदार हा पुरस्कार मिळाला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या