संतापजनक ! वृध्दाश्रमात साखळदंडानं बांधून ठेवलं जात होतं ज्येष्ठांना, एका खोलीत कैद केलेल्या 73 जणांना सोडवलं

हैद्राबाद : वृत्तसंस्था – हैद्राबादमधील एका गावातून हैराण करणारी एक बातमी समोर आली आहे. एका वद्धाश्रमात वृद्धांसोबत अमानुष वर्तन केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. असं सांगितलं जात आहे की, वृद्धाश्रमात राहणाऱ्या लोकांना साखळ्यांनी बांधून ठेवलं जात होतं. वृद्धांनी आरडाआरोडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एका खोलीत जवळपास 73 लोकांना कैद करून ठेवण्यात आलं होतं. या सर्वांनाचा आता मुक्त करण्यात आलं आहे.

पोलिसांनी हे प्रकरण समोर आल्यानंतर वृद्धाश्रमाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शॅक रतन, जॉन पॉल, के. भारती आणि इतर तीन लोकांविरोधात कारवाई केली गेली आहे. हे सर्वजण दोन घरात एक वृद्धाश्रम चालवत होते. तक्रारीत असं म्हटलं आहे की, यातील वृद्ध मनोरुग्ण आणि मानसिक संतुलन ढासळलेले आहेत.

तेलंगणा पोलिसांनी दाखल केला गुन्हा
सर्वांनाच वृद्धाश्रमात ठेवलं जात होतं आणि त्यांच्यासोबत अमानुष वर्तन केलं जात होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, एका खोलीत असलेल्या कैद 73 लोकांची सुटका करण्यात आली आहे. पॅरेंट सिटीझन अ‍ॅक्ट 2007 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्रमाच्या व्यवस्थापनाविरोधात मेंटेनेंस वेलफेअर सीनियर सिटीझन अ‍ॅक्ट 2007 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा –