आता ‘या’ राज्यात सुरु होणार ‘आयुष्मान भारत योजना’; मोफत होणार उपचार अन् मिळणार 5 लाखांचा विमा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस महामारीच्या काळात तेलंगणा राज्यात देशातील सर्वात मोठी आरोग्य योजना ‘आयुष्मान भारत योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये योजना लागू करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणासह एक सामंजस्य करार केला आहे.

मोफत उपचार आणि पाच लाख रुपयांपर्यंत मोफत विमाची ही योजना देशातील अनेक राज्यांत सुरु आहे. जाणून घ्या काय आहे ही योजना, कशी काम करते आणि त्याचे फायदे काय?

– ही योजना 107.4 मिलियनपेक्षा जास्त गरीब आणि असहाय्य कुटुंबासाठी जवळपास 530 मिलियन लाभार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रति कुटुंब 5 लाख रुपयांचे वार्षिक कवच देते.

– यामध्ये कार्डियोलॉजी, न्यूरोसर्जरी, ऑन्कोलॉजी, बर्न्ससारखी 1354 मेडिकल आणि सर्जिकल पॅकेजचा समावेश आहे.

– याअंतर्गत सर्व सेवांचे कॅशलेस आणि पेपरलेस लाभ मिळतो.

– पात्र लोकांना सरकारी आणि सूचीबद्ध खाजगी रुग्णालयात लाभ घेता येऊ शकतो.

– आयुष्मान भारताच्या लाभार्थ्यांच्या कोरोनावरील उपचारासाठी परीक्षण आणि उपचारही मोफत आहे.

– जानेवारी, 2021 पर्यंत योजनेंतर्गत 40,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोविड-19 वर उपचार केले गेले होते.

– या योजनेबाबत माहिती मिळण्यासाठी ‘आप के द्वार आयुष्मान’ अभियान सुरु करण्यात आले आहे.

– या अभियानांतर्गत 14 मार्चला 8 लाख रेकॉर्ड लाभार्थी जोडण्यासह आले आहे.

– उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब आणि जम्मू-काश्मीरसह इतर राज्यांत 1.2 कोटी लाभार्थी नोंदणीकृत आहेत.