Video : तेलंगणाची 23 वर्षीय मानसा वाराणसी बनली Miss India World 2020

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तेलंगणाची मानसा वाराणसी 2020 ची फेमिना मिस इंडिया वर्ल्ड बनली आहे. अवघ्या 23 व्या वर्षी तिनं हा किताब आपल्या नावावर केला आहे. हरियाणाची मणिका शोकंद आणि उत्तर प्रदेशची मान्या सिंह यांना मागे टाकत मानसानं फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020 चा मुकूट आपल्या नावावर केला आहे. मणिका शोकंद ही मिस ग्रँड इंडिया 2020 तर मान्या सिह ही मिस इंडिया 2020 ची रनरअप ठरली आहे.

मुंबईच्या हयात रिजेंसी हॉटेलात बुधवारी रात्री मिस इंडिया 2020 चा फिनाले रंगला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची स्पर्धा ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात पार पडली आहे.

बॉलिवूड ॲक्ट्रेस वाणी कपूर, चित्रांगदा सिंह, नेहा धुपिया, अभिनेता अपारशक्ती खुराना आणि पुलकित सम्राट यांनी या स्पर्धेला उपस्थिती लावली होती. अपारशक्ती या कार्यक्रमाचा होस्ट होता तर पुलकित सम्राट आणि चित्रांगदा या फिनालेचे पॅनलिस्ट होते. वाणी ही स्टार परफॉर्मर होती. खुशी मिश्रा, मान्या सिंह, मानसा, रती हुलजी आणि मणिका शोकंद या फेमिना मिस इंडियाच्या टॉप-5 फायनलिस्ट होत्या.

कोण आहे मानसा वाराणसी ?
23 व्या वर्षी मिस इंडिया वर्ल्ड 2020 चा किताब आपल्या नावावर करणारी मानसा वाराणसी तेलंगणाची आहे. हैदराबादमध्ये राहणाऱ्या मानसनं यापूर्वी मिस तेलंगणा हा किताब आपल्या नावावर केला होता. मानसा ही इंजिनियर आहे. वसवी कॉलेजातून तिनं इंजिनियरींगची पदवी घेतली आहे. मानसा व्यवसायानं फायनान्शियल एक्सचेंज इंफोर्मेशन ॲलिस्ट आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियरींग करणाऱ्या मानसानं 8 वर्षे भरतनाट्यम शिकलं आहे. 4 वर्षे तिनं संगीताचे धडे घेतले आहेत. वाचन, गाणी ऐकणं, डान्स आणि योगा हे तिचे छंद आहेत.