‘या’ कारणामुळं अचानकपणे टेलिकॉम कंपन्यांनी वाढवले ‘दर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वोडाफोन आयडिया आणि एयरटेल या कंपन्यांनी 1 डिसेंबर पासून आपले दर वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नुकतेच जिओ ने देखील जिओ व्यतिरिक्त इतर कंपन्यांना फोन केल्यास दर आकारणे सुरु केले आहे. एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यू (AGR) सारख्या समस्यांमुळे सर्व टेलिकॉम कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे.

वोडाफोन आणि आयडियाला तर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नुकसानीला सहन करावे लागले आहे. यामुळे कंपन्या सध्या आपले दर वाढवून झालेला तोटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. जिओचे दर मात्र अजूनही बाकी कंपन्यांच्या मानाने खूप कमी आहेत.

मोठ्या तोट्यात आहेत टेलिकॉम कंपन्या
सरकारकडून लावण्यात आलेल्या एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यू (AGR) मुळे अनेक कंपन्यांना मोठे नुकसान होत आहे. वोडाफोन आणि आयडिया सारख्या कंपन्यांना आतापर्यंत दुसऱ्या सहामाईत 50,921 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा तोटा आहे. एअरटेल कंपनीला सुद्धा जुलै सप्टेंबर 2019 पर्यंत 23,045 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. एकूणच सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या या करामुळे सर्व टेलिकॉम कंपन्या अडचणीत सापडलेल्या आहेत.

24 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने टेलिकॉम कंपन्यांकडून 94 हजार कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत आणि यामुळेच दरात वाढ करत असल्याचे वोडाफोन आणि आयडिया या कंपनीने सांगितले आहे.

काय आहे AGR
एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यू (AGR) दूरसंचार विभागाद्वारे टेलिकॉम कंपन्यांकडून घेतला जाणारा युजेस आणि लाइसेंसिग शुल्क आहे. याचे दोन हिस्से आहेत स्पेक्ट्रम यूजेज चार्ज आणि लाइसेंसिंग शुल्क जो की अनुक्रमे 3 – 5 % आणि 8 % असतो.

एअरटेल, वोडाफोन आणि आयडियावर सर्वात अधिक बोजा
यानुसार एअरटेलला 43 हजार कोटी रुपये, वोडाफोन आइडियाला 40 हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. यासाठीची अंतिम तारीख 24 जानेवारी आहे. जिओच्या येण्याने आन अन्य काही कारणांमुळे अनेक टेलिकॉम कंपन्यांची परिस्थिती खराब आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्व कंपनीनसाठी घातक ठरत आहे.

का होत आहे नुकसान
कंपन्यांना AGR साठी स्वतंत्र पैसे ठेवावे लागत आहेत. वोडाफोनचे कार्यकारी अधिकारी निक रीड सांगतात की, अनेक दिवसांपासून भारतात टेलिकॉम व्यापार करणे खूप अवघड झाले आहे. त्यांनी हे देखील सांगितले की सरकारने याबाबत काही निर्णय दिला नाही तर वोडाफोन भारतातून आपला मुक्काम हलवेल.

Visit : Policenama.com