Telegram मध्ये आलं मोठं अपडेट, वापरकर्त्यांना मिळणार ‘ही’ सुविधा, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीनंतर टेलिग्रामला बराच फायदा झाला आहे. पण टेलिग्राम वापरकर्त्यांना टेलिग्रामवर त्यांच्या व्हॉट्सअॅप डेटाचा बॅक अप घेण्यास बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता कंपनीने आपल्या नवीन ग्राहकांच्या सोयीसाठी बॅकअप फीचर जारी केले आहे. टेलिग्रामने आपल्या आयओएस अॅपसाठी माइग्रेशन टूल लॉन्च केले आहे, ज्याच्या मदतीने व्हॉट्सअॅप किंवा इतर कोणत्याही मेसेजिंग अॅपवरून टेलिग्रामवर डेटा बॅक अप घेतला जाऊ शकतो. टेलिग्रामचे हे नवीन अपडेट आयओएएसच्या आवृत्ती 7.4 मध्ये आहे, दरम्यान, आणखी एक अपडेट (टेलिग्राम 7.4.1) लवकरच येणार आले, ज्यात मायग्रेशन टूल संदर्भात कोणतीही चर्चा नाही. नव्या अपडेटच्या माध्यमातून वापरकर्ते त्यांच्या व्हॉट्सअॅप अकाउंटचा संपूर्ण डेटा टेलिग्रामवर ट्रान्सफर करू शकतात.
टेलिग्राम 7.4 अपडेटमध्ये, माइग्रेशन टूलचा स्पष्ट उल्लेख ‘ Move your chat history from other apps (WhatsApp, Line and KakaoTalk) to Telegram’ ने केला आहे. नवीन व्हर्जन 7.4.1 हे देखील डेटा ट्रान्सफरचे वैशिष्ट्य आहे. टेलिग्रामने अधिकृतपणे नवीन अपडेटची घोषणा केलेली नाही. परंतु वापरकर्त्यांना हे अपडेट मिळत आहे.
टेलिग्रामवर व्हॉट्सअॅप डेटा बॅकअप कसा घ्यावा ?
आपणास टेलिग्रामवर आपले व्हॉट्सअॅप अकाऊंट बॅकअप घ्यायचे असेल तर व्हॉट्सअॅपमध्ये कोणतेही चॅट राईट टू लेफ्ट स्वाइप करा. यानंतर आपण More च्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट चॅटचा पर्याय मिळेल. यानंतर आपल्याला विचारले जाईल की आपणास अटॅचमेंट शिवाय बॅकअप घ्यायचा आहे की अटॅचमेंटसह. यानंतर, आपण टेलिग्राम निवडून चॅटचा बॅक अप घेऊ शकता.