टेलीग्राममध्ये आलं नवं ‘अपडेट’ ! थीमच्या बदला व्यतिरिक्त इतरही चांगले फीचर्स, WhatsApp ला देणार ‘टक्कर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपचे स्पर्धक मानले जाणारे सोशल मीडियातील एक प्रसिद्ध अ‍ॅप असलेल्या टेलीग्रामने व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी खास फीचर आणले आहे. टेलीग्रामच्या नव्या अपडेटमध्ये अ‍ॅण्ड्राइड आणि आयओएस दोन्ही यूजर्ससाठी थीम आणि कलर ग्रेडिएंटला क्रिएट आणि कस्टमाइज करण्याची सुविधा मिळेल. 5.13 हे लेटेस्ट या अपडेट ही सुविधा आहे.

या फीचरमध्ये टेलीग्राम थीम एडिटर 2.0 घेऊन आले आहे, जे यूजर्सच्या थीमच्या कलरला आणि बॅकग्राऊंटला पूर्णता बदलून टाकेल. या नव्या फीचरमध्ये यूजर आपल्या पसंतीचा कोणताही रंग निवडू शकेल. याशिवाय टेलीग्रामने प्रायवेसी आणि मेसेज शेड्यूलचे फीचर दिले आहे.

याशिवाय कंपनीने अनेक बदल केले आहेत जे यूजर्सला एक उत्तम इंटरफेसचा अनुभव देतील. टेलीग्रामकडून सांगण्यात आले की डार्क मोडला आता अनेबल करणे जास्त सोपे होईल आणि आर्काइव्ह मेसेजला रीड इंस्टंटलीच्या रुपात ठेवले जाऊ शकते. तसेच अ‍ॅण्ड्राइड यूजर्सला नवे अ‍ॅनिमेशन पाहायला मिळेल.

याशिवाय यूजर्स वेन्यू देखील सिलेक्ट करु शकेल ज्याने ते आपले लोकेशन सहज शेअर करु शकतील. म्हणजेच यूजर्स थेट मॅपवर क्लिक करुन आपले लोकेशन शेअर करु शकतात त्यांना यासाठी टाइप करावे लागणार नाही. या नव्या अपटेडमध्ये अनेक फन अ‍ॅनिमेशन, फॉन्ट साइज वाढवणे, कमी करणे असे पर्याय आणि अकाऊंट्स स्विच करणे असे पर्याय उपलब्ध होतील.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/