टेलिमेडिसीनद्वारे उपचार आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत : आबा बागुल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी इतर रुग्णालयातील कोरोना रुग्णांना टेलिमेडिसीनद्वारे उपचार करावेत असा सल्ला आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांनी दिला आहे. त्यांची ही भूमिका निर्णय स्वागतार्ह आणि उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी व्यक्त केली आहे.

ससून रुग्णालयाला आरोग्यमंत्री टोपे यांनी आज सोमवारी भेट दिली, तेव्हा टेलिमेडिसीन उपचाराचा सल्ला दिला.जे कोरोनाचे रुग्ण घरी राहून उपचार घेत आहेत त्यांनाही टेलिमेडिसीन पद्धतीने उपचार द्यावेत तसेच ज्येष्ठ, अनुभवी डॉक्टरांच्या अनुभवाचा लाभही रुग्णांना व्हावा याकरिता त्यांनाही उपक्रमात सहभागी करून घ्यावे. पुण्यात ५५ वर्षांवरील दीड हजार डॉक्टर्स आहेत आणि त्यातील अनेकांनी साथीमुळे प्रॅक्टीस थांबवली आहे. . ही संख्या मोठी असून टेलिमेडिसीन पध्दतीने रुग्णांना दिलासा मिळेल, रुग्णालयातील गर्दी टळेल, याचा विचार व्हावा असे आवाहन आबा बागुल यांनी आरोग्यमंत्र्यांना केले आहे.