Coronavirus : ‘कोरोना’वरून PM मोदी – डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा

 पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला असून जगातील 200 पेक्षा जास्त देशांत व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, अमेरिकेत मागील 24 तासांत 1 हजार 480 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अमेरिकेत सहा हजारांपेक्षा जास्त जणांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर दोन लाख 30 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच धर्तीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी कोरोना व्हायरस या महामारी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती दिली. भारत आणि अमेरिका मिळून या महामारीचा सामना करतील असे दोन्ही नेत्यांचे चर्चेनंतर एकमत झाले आहे. करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी दोन्ही देशांना एकत्र यावे लागेल असी चर्चा झाली.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला महामारी घोषित केले आहे. या महामारीवर अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नसल्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटली, स्पेन आणि अमेरिकेला बसला आहे. आर्थिक महासत्ता असणार्‍या अमेरिकेनेही या रोगाची धास्ती घेतली आहे.