‘कोरोना’बद्दल ट्विट करून ट्रोल झाली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी, नेटकऱ्यांनी डिलीट करायला लावलं Tweet (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिनं नुकतंच कोरोना व्हायरसबद्दल एक ट्विट केलं होतं. कोरोनाच्या या ट्विटमुळं दिव्यांका टीकेच धनी होताना दिसली. दिव्यांकानं ट्विटमध्ये लिहिलं की, “मुंबईत एवढं कमी ट्राफिक पाहून वाटतं की, मेट्रो, पूल आणि रस्त्यांची कामं लवकर उरकण्यासाठी ही उत्तम संधी आहे.”

दिव्यांकानं एक व्हिडीओदेखील पोस्ट केलं आहे. यात तिनं दाखवलं कोरोनामुळं मुंबईतील रस्त्यावर किती कमी ट्राफिक आहे. वेळेसोबत कोरनाचा धोका कमी होईल अशी अपेक्षाही तिनं व्यक्त केली. तिनं म्हटलं की, मेट्रोची आणि रस्त्यांची कामं आता पूर्ण होतील. कारण कामगार आता कोणत्याही अडथळ्यांशिवाय आरामात आपलं काम करू शकतात.

https://twitter.com/siya_siyamishra/status/1239804633830342656

दिव्यांकानं जे ट्विट केलं ते लोकांना अजिबात आवडलं नाही. अनेकांनी तिच्या या ट्विटवर कमेंट करत दिव्यांकावर निशाणा साधला आहे. एकानं लिहिलं की, कामगारही माणसंच आहेत. सध्या आपत्ती आहे. सर्वांनाच सुरक्षेची गरज आहे. आणखी एकनं कमेंट केली की, जसं काय इंजिनियर्स आणि कामगारांच्या जीवनाला काही किंमतच नाहीये. अशा स्थितीत हे किती विचित्र ट्विट आहे. एकानं तर तिला असंवेदनशील असल्याचं म्हणत ट्विट डिलीट करण्यास सांगितलं.

https://twitter.com/TinaDwivedi1/status/1239794945843539969

या सगळ्यानंतर दिव्यांका त्रिपाठीला आपल्या चुकीची जाणीव झाली. यानंतर दिव्यांकानं हे ट्विट डिलीट केलं. परंतु काही नेटकऱ्यांनी तिचा व्हिडीओ डाऊनलोड करून सोशल मीडियावर शेअर आहे.