अभिनेत्री चित्राने मालिकेत इंटिमेट सीन दिल्याने भडकला होता पती, भांडणांमुळे तिने केली आत्महत्या ?

पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसापूर्वी तमीळ अभिनेत्री विजे चित्राने ( vj chithra) आत्महत्या केली होती. चेन्नईतील एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह सापडला होता. आता तिच्या आत्महत्या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. चित्राच्या आत्महत्येचे कारण पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. पती हेमंत यांच्यासोबत झालेल्या भांडणामुळे तीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चित्राचे ( vj chithra)  पती हेमंत यांना या संदर्भात अटक केली असून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा त्यांच्यावर आरोप लावला आहे.

चित्राने 9 डिसेंबर रोजी चेन्नईतील एका हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. चित्राने एका मालिकेत इंटिमेट सीन दिला होता. पण या सीनमुळे हेमंत संतापल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांना माहिती मिळाली आहे की, हेमंत त्यांची पत्नी चित्रावर नेहमीच संशय घेऊन तिचा मानसिक छळ करत असत. त्यामुळेच चित्राने आत्महत्या केली. चित्रा चित्रीकरण संपवून रात्री अडीच वाजता हॉटेल रूमवर पोहोचली होती. हॉटेलमध्ये ती तिच्या पतीसोबत राहात होती. हेमंत यांनी पोलिसांना सांगितले होते की, हॉटेल रूमवर पोहोचल्यावर चित्रा आंघोळ करायला बाथरूममध्ये गेली होती. पण खूप वेळ होऊनही ती परत न आल्याने त्यांनी हॉटेल स्टाफला कळवले. ड्युपिलिकेट चावीने दरवाजा उघडला असता चित्रा यांचा मृतदेह सिलिंगला लटकलेला होता असे सांगितले होते.

तर नुकतीच हेमंत यांच्या जामिनावर सुनावणी झाली. यावेळी त्यांच्या वकिलाने त्यांची बाजू मांडताना सांगितले की, हेमंत यांनी कधीच त्यांच्या पत्नीवर संशय घेतला नाही की तिचा मानसिक छळ केला नाही. तसेच तिला अभिनयक्षेत्र सोडण्यास सांगितले नसल्याचे म्हटले आहे.