Bigg Boss 14 : बेघर होताच सिद्धार्थ शुक्लाने साधला हिना- गौहरवर निशाणा, अप्रत्यक्ष मांडली ‘ही’ बाब

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चित रियलिटी शो बिग बॉस लोकांचे मनोरंजन करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. यावेळी बिग बॉसमध्ये कंटेस्टंटसोबत काही सिनियर्ससुद्धा दिसत आहेत. या सिनियर्समध्ये हिना खान, गौहर खान आणि सिद्धार्थ शुक्ला सहभागी होते. मात्र, आता हे सिनियर्स शोच्या बाहेर आले आहेत. परंतु, शोच्या बाहेर येताच – एकमेकांवर निशाणा साधण्याचे सत्र सुरू आहे.

हिना, गौहर आणि सिद्धार्थ तिघांना शोमध्ये लोकांनी खुप पसंत केले. तिघांचे बॉडिंग खुप चांगले होते, ज्यामुळे त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. बिग बॉसमध्ये काही दिवसांच्या आतच त्यांच्यात भांडणं आणि वादसुद्धा झाले. परंतु, शेवटी या तिघांमध्ये जो मोठा वाद झाला, त्यावरून दिसते की, सिद्धार्थ शुक्ला अजूनही ते विसरलेला नाही, यामुळेच त्याने अप्रत्यक्षपणे हिना आणि गौहरवर निशाणा साधला आहे.

बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर सिद्धार्थ शुक्लाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले. या ट्विटमध्ये त्याने म्हटले, स्वत:शी ईमानदार असणे खुप जरूरी आहे. लॉजिकल असणे जरूरी आहे. लॉयल असणे जरूरी आहे. अन्यथा, तुम्ही आरशाला कसे तोंड दाखवू शकता. या पोस्टसोबत त्याने #BeTrueToYourself#WeAreWithSidharthShukla #TeamSidharthShukla या हॅशटॅग्सचा सुद्धा वापर केला आहे.

मात्र, आपल्या या ट्विटमध्ये सिद्धार्थने कुणाचेही नाव लिहिले नाही. परंतु ते पहाता हेच म्हटले जात आहे की, हे ट्विट त्याने गौहर आणि हिनावर निशाणा साधण्यासाठी केले आहे. त्याचे फॅन्स हे ट्विट पसंत करत आहेत आणि त्याचे कौतूकही करत आहेत.

बिग बॉसने कंन्फर्म होण्यासाठी घरातील लोकांना एक टास्क दिला होता. ज्यामध्ये सर्व सदस्यांना तिन सिनियर्सच्या टीममध्ये सहभागी व्हायचे होते. टीम सिद्धार्थ हा टास्क हारली. हिना आणि गौहर खानने सिद्धार्थच्या टीमवर चिटींगचा आरोप केला. रिझल्टवरून हिना-गौहरची सिद्धार्थसोबत बरीच वादावादी झाली, परंतु जेव्हा कोणत्याही निर्णयावर ते पोहचले नाहीत, तेव्हा आपसातील सहमती सोडून बहुमतावर निर्णय घेतला गेला.

You might also like