बिग बॉस मराठीच्या फॅन्ससाठी आहे ‘ही’ वाईट बातमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘बिग बॉस मराठी २’ च्या पर्वाची प्रेक्षक खुप वाट पाहत होते. याची तारीख ही ठरली होती. १४ एप्रिलपासून या कार्यक्रम सुरु होणार होता. मात्र, कार्यक्रमाची तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात आली. लोकसभा निवडणूक असल्यामुळे कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलून हा कार्यक्रम मे महिन्यात सुरु होणार होता. पण आता पुन्हा प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस १९ मे ला सुरु होणार असल्याचे समजले होते. याबद्दल सर्व स्पर्धकांना यांची माहिती देखील दिली होती. याचे चित्रीकरण १७ किंवा १८ मे ला होणार होते. पण आता हा कार्यक्रम २६ मे सुरु होणार असून याचे चित्रीकरण २४ आणि २५ मे ला होणार आहे.

‘बिग बॉस’ च्या घरात स्पर्धकांची नावे जाहिर झाली आहे. या मध्ये अभिनेता मिलिंद शिंदे, कवी मनाचे नेते म्हणून प्रचलित असलेले अभिजीत बिचकुले, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेत्री रसिका सुनील, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेत्री केतकी माटेगांवकर, टिकटॉक गर्ल अमृता देशमुख, अभिनेता दिगंबर नाईक, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री नेहा पेंडसे अशी नावे चर्चेत आहे.

बिग बॉस मराठीमध्ये कोण सहभागी होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. कलर्स मराठी वाहिनीने सोशल मिडियावर काही दिवसांपूर्वी प्रोमो शेअर केला असून या प्रोमोमधून लोकांना हिंट देखील दिली आहे. लोकसभेचा निकाल २३ मे ला जाहीर होणार असल्यामुळे ‘बिग बॉस मराठी २’ तारीख पुढे ढकलण्यात आली. प्रमियर नाईटच्या टिआरपीमध्ये फरक पडू नये यासाठी हा निर्णय घेत जात असल्याचे म्हटले आहे.

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे चित्रीकरण लोणावळ्यात झाले होते. पण आता दुसऱ्या सिझनचे चित्रीकरण लोणावळ्यात नव्हे तर गोरेगाव फिल्मसिटीमध्ये होणार आहे. त्यासाठी तिथे सध्या सेट बांधण्याचे काम देखील सुरु आहे.