शिक्षकांनी कलम 370 बद्दल जनजागृती करावी : योगी आदित्यनाथ

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेहमी चर्चेत असतात. गुरुवारी लोकभवन मध्ये शिक्षकांना संबोधित करताना त्यांनी शिक्षकांना काही उपदेश केले. मुख्यमंत्रयांच्या म्हणण्यानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कलम ३७० बाबत अवगत करावे. सर्व शिक्षकांनी मुलाना हे सांगितले पाहिजे की, शामा प्रसाद मुखर्जी यांनी सुद्धा कलम ३७० चा विरोध केला होता. सोबतच तीन तलाक वर चर्चा झाली पाहिजे. यासाठी शिक्षण संस्थांनी समोर आले पाहिजे. महिला सशक्तीकरणाबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले गेले पाहिजे. शिक्षण संस्थांची समाजाच्या प्रति जबाबदारी केवळ प्रमाणपत्र देणे नसून समाजसेवेची जाबदारी सुद्धा आहे.

शिक्षकांचा सन्मान आणि गुणवत्ता वाढवण्यावर भर
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्यात मागच्या २ वर्षात शिक्षणाच्या बाबतीत सुधारणा झाल्या असल्याचे सांगितले. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी आंदोलने झाली. शिक्षण क्षेत्रात झालेले बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत. सरकारने शिक्षकांचा सन्मान वाढवण्यासोबत त्यांची गुणवत्ता वाढवण्यावर देखील भर दिला आहे. शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्यांचा आमचे सरकार सन्मान करत आहे. शिक्षणाच्या बाबतीत प्रत्येक स्तरावर आम्हाला काही ना काही नवीन पाहायला मिळाले आहे.

परीक्षा कॉपीमुक्त होण्यात यश
मुख्यमंत्री म्हणाले की, सत्तेमध्ये आलो तेव्हा आमच्या समोरील सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे, कॉपीमुक्त परीक्षा घेणे. यामध्ये आम्हला यश मिळाले आहे. उच्च शिक्षणात अभ्यासक्रमासोबत सत्र सुद्धा नियमित झाले. आज उत्तर प्रदेश मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा पास होण्यास योग्य बनवले जात आहे. सरकारने उच्च, माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणात सुधारणा करण्याच्या प्रयत्नांचे हे परिणाम आहेत. प्रदेशात २१ हजार विनानुदानित विद्यालय झाले आहेत. याठिकाणी सर्वांच्या सामाजिक सुरक्षा वाढावी या दिशेने प्रयत्न होत आहेत. ज्या ठिकाणी खाजगी विद्यालय सुरु होऊ शकत नाहीत त्या ठिकाणी सरकार विद्यालये सुरु करणार आहे. सध्या अजमगढ आणि सहारनपूर मध्ये २ नवीन राज्य विश्व्विद्यालय बनवण्याची प्रक्रिया सरकरने सुरु केली आहे.

राज्यपालांनी शिक्षकांना दिला सल्ला
शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे साधन आहे. भविष्य उज्वल बनवण्याच्या दिशेने शिक्षण खूप मोठी भूमिका पार पाडते. यावेळेस उत्तरप्रदेश च्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी शिक्षकांना संबोधित केले. त्यांनी आपले विविध अनुभव उपस्थितांसमोर मांडले. तसेच त्यांनी काही अशा शिक्षकांची उदाहरणे दिली जे उत्तम काम करत आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, जेव्हा-जेव्हा भाजपचे सरकार येते तेव्हा बदल दिसून येतो. आनंदीबेन यांनी शिक्षकांना आपल्या शाळा उतकृष्ट बनवण्याचा संकल्प करण्याचा सल्ला दिला.

आरोग्यविषयक वृत्त –